अमित आणि अपर्णा वाईकर चीनमध्ये शांघाय येथे गेली दहा वर्षे राहत आहेत. अमित एका मोठ्या कंपनीत सिनियर व्हाइस प्रेसिडेंट आहेत, पण त्याहून त्यांचे महाराष्ट्राच्या-मराठीच्या दृष्टीने वैशिष्ट्य म्हणजे त्या दांपत्यास त्यांच्या मातृभूमीबद्दल असलेली आस्था. अपर्णा विविध मराठी वर्तमानपत्रांत चीनमधील जीवनाबद्दल लिहीत असतात. अमित चीनमधील भारतीयांच्या संघटनेत क्रियाशील असतात, टीव्ही-रेडिओवर मुलाखती देतात. चीनमध्ये पंच्याहत्तरहजार भारतीय आहेत. अमित यांना सन्मान्य प्रवासी भारतीय म्हणून पुरस्कारही मिळाला आहे. मध्यंतरी त्यांची रेडिओवर मुलाखत ऐकून त्यांच्याशी बोलणे झाले होते. चीन कोरोनाला कसे तोंड देत आहे अशी ती मुलाखत होती.
अपर्णा वाईकर |
मी म्हटले, की पण चीनमध्ये रोगाचा पुनरुद्भव होत असल्याच्या बातम्या कळतात. ते म्हणाले, की बरोबर आहे. ते परदेशांतून देशात परतलेले चिनी लोक आहेत. चीनमध्ये कोरोनाआला तेव्हा देशात वर्षारंभ सण होता. तो मोठा महोत्सव असतो, सुट्या असतात. अनेक लोक त्यानिमित्ताने परदेशी गेले; ते तिकडेच अडकले होते. ते आता परतत आहेत. मध्येच अपर्णा म्हणाल्या, सुट्या संपल्यावर शाळा सुरू झाल्या. चीनमध्ये त्या काळात इ-लर्निंगहोते. आमच्या लेकाची शिक्षिका अमेरिकेत सुट्टीला गेली होती. ती तिकडेच अडकली. तर ती तेथून वर्ग घेई, तिचा फोन आमच्या लेकास पहाटे साडेपाच वाजता येई.
मला अमित यांचे कौतुक यासाठी वाटते, की त्यांना भारत आणि महाराष्ट्र याबाबत जेवढा अभिमान आहे, तेवढाच अभिमान त्यांचे कार्यस्थळ असलेल्या चीनबद्दलही आहे. ते म्हणतात, की भारताने चीनकडून अनेक गोष्टी शिकाव्यात अशा आहेत. वुहान खुले झाले म्हणून जाहीर केल्यावर शनिवार-रविवारी हजारो लोक तेथे उद्याना-उद्यानांत जमले. पण त्यात धोका संभवतो हे जाहीर करताच लोक पांगले. कोरोनाचा धोका पुऱ्या मानवजातीला आहे, कोविड–19वर माणसाने मात केली तरी कोविड-20 संभवतो. तो येण्यास नको असेल तर निसर्गाला जाणुया. अमित यांचे पुढील वाक्य मला आवडले. ते म्हणाले, we are the virus, corona is cure.
——————————————————————————————————————
—————————————————————————————————
जीथे आपण रोजीरोटी मिळवितो त्या देशाबद्दल कृतज्ञता हवीच व आपल्या मातृभूमी बद्दल ही प्रेम हवे श्री व सौ.वाईकर यांच्याकडे या दोन्ही गोष्टी आहेत.खूपच छान! सौ.अनुराधा नरेश म्हात्रे.
Vachun khup khup Aanand zala.Vhuan pramane aapan sudha koronala kaymcha sampun taku. Jay Hind Jay Maharashtra 🌹🚩🚩🚩
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
उपयुक्त माहिती,धन्यवाद, योग्य मार्गदर्शन मिळाले
We are virus..Korona is cure..वा. हा लेख चीन बद्दल जे गैरसमज सामान्य लोकांमध्ये आहेत ते खोडून काढण्यासाठी मदत करेल असे वाटते कारण हा “आँखो देखा हाल “आहे..संध्या जोशी.मुंबई
फारच छान लेख .जन्मभूमी आणि कर्मभूमि दोन्हीबद्दल विशेष आस्था हे फार कौतुकास्पद आहे .लेख वाचून करोनाशी लढायला अजून बळ मिळते.सौअंजली आपटे.
वा खूपच छान लेख,,,,
आपण काय करायला हवं हे कळलं.भारतीय लोकशाहीत ते होईल का?इथे तर जनगणना व नागरिकत्व पडताळणीसुद्धा राजकारण्यांनी लटकवलीय.क्यूआर कोड फारच दूरची गोष्ट झाली.चीनच्या कॅरेक्टर/स्वभावात एक निर्घृणपणा जाणवतो.कदाचित शिस्तीच्या नावाखाली तो झाकला जात असावा?
amazing work Amit and Aparna !!
अमित आणि अपर्णा यांना चीनबद्दल सार्थ अभिमान आहे.QR कोड बद्दल नव्याने कळले.Corona प्रकरणाला जबाबदार असणाऱ्या आणि त्यालाही जबाबदार असणाऱ्या त्यांच्या खाण्याच्या सवयींबद्दल कुठेही अपराधीपणाची भावना चीनने एकदाही व्यक्त केली नाही याचे मात्र मला राहून राहून आश्चर्य वाटत आहे कोणी देईल का याचे उत्तर?
नीना आंबेकर तुमच्या प्रश्नाचे उत्तर सोबतच्या लिंकवरील लेखावरून तुम्हाला मिळेल.https://www.thinkmaharashtra.org/2020/04/corona-indias-opportunity.html