भारतीय गूढ तत्त्वज्ञानाने पाश्चिमात्य जगाला नेहमीच भारून टाकले आहे; तसेच, कुतूहल भारतीय जादूटोणा, तांत्रिक-मांत्रिक, साधू-फकीर यांनी तेथे निर्माण केले आहे. अखिल आधुनिक पाश्चिमात्य जगावर मोहिनी घालणारा खराखुरा ‘नंगा फकीर’ म्हणजे मोहनदास करमचंद गांधी! महात्माजींना ‘नंगा फकीर’ ही पदवी दिली, ज्यांच्या साम्राज्यावर सूर्य कधी मावळत नसे अशा इंग्लंडच्या अत्यंत प्रभावी पंतप्रधानांनी, म्हणजे चर्चिल यांनी...