बिचुकले गाव (Bichukle Village)

0
80

बिचुकले हे गाव सातारा जिल्ह्यातील कोरेगाव तालुक्यात कोरेगावपासून वीस किलोमीटर अंतरावर आहे. त्या गावची लोकसंख्या एक हजार पाचशेपस्तीस आहे. कायम दुष्काळी भाग अशी ओळख असलेल्या कोरेगाव तालुक्याच्या उत्तर भागातील गावाने काळाची पावले ओळखून ‘ना राजकारण, ना पक्ष, जलसाक्षरता व ग्रामविकास हे आमचे लक्ष्य,’ असा नारा दिला. गावाने परिसरात जलसंधारण, ग्रामस्वछता व दुष्काळ निवारणाचे काम गेल्या तीन वर्षांपासून हाती घेतले आहे. गाव त्याच कामांमुळे आता प्रसिद्ध होत आहे.

उदरनिर्वाहाचे मुख्य साधन अद्याप शेती आहे. ती पावसाच्या पाण्यावर पिकते. परिसरात सुमारे दोनशे हेक्‍टरवर कांदा पीक घेतले जाते.

गावात ग्रामदैवत जानाई देवी, विठ्ठल रूक्मिणी आणि मारूती मंदिर आहे. जानाई देवीची यात्रा चैत्र-पौर्णिमेला असते. गावाच्या सीमेवर डोंगर आहे. डोंगरावर पुरातन शिवलिंग आहे. त्याच प्रकारे तुकाईदेवीचे मंदिर आहे. गावचे वातावरण समशीतोष्ण आहे. गावात ओढा आणि पाझर तलाव आहेत. डोंगरावर पुरातन शिवलिंग आहे. तुकाईदेवीचे मंदिर आहे.

बाजार चार किलोमीटर अंतरावर असलेल्या वाठार या गावी दर शुक्रवारी भरतो. गावात सातवीपर्यंत शाळा आहे. गावचे विद्यार्थी पुढील शिक्षणासाठी वाठार व देऊर या गावी जातात.

गावात एस टी येते. गावाच्या चार किलोमीटर अंतरावर वाठार रेल्वे स्टेशन आहे. गावाच्या जवळपास देऊर, नलवडेवाडी, दुजरवाडी, तळी ही गावे आहेत.

माहिती स्रोत: संभाजी पवार 9423342266.

– नितेश शिंदे

About Post Author