पुणतांबा (Puntamba)

0

पुणतांबा हे गाव अहमदनगर जिल्ह्यात आहे. गाव कोपरगावपासून आग्नेये बारा मैलांवर आहे. गावची लोकसंख्या 1981च्या जनगणनेनुसार पाच हजार सातशे सत्याऐंशी आहे. गाव मोठ्या बाजारपेठेचे आहे. तेथे दौंड-मनमाड रेल्वेचे स्थानक आहे. बहुसंख्य व्यापारी मारवाडी व ब्राम्हण समाजाचे असून त्यांची संपत्ती रूपये साठ हजारपर्यंत आहे.

पुणतांबा येथे चौदा मंदिरे आधुनिक काळात बांधलेली असून तेथील गोदावरी नदीवर अहिल्याबाई होळकरांनी व कोणा एका शिवराम धुमाळ यांनी घाट बांधलेला आहे. तेथील प्रमुख चांगदेव महाराजांना एक हजार चारशे शिष्य होते असे म्हणतात. त्याशिवाय तेथे अन्नपूर्णा, बालाजी, भद्रकाली, शंकर, गोपाळकृष्ण, जगदंबा, कालभैरव, काशिविश्वेश्वर, केशवराज, महारूद्राशंकर, रामचंद्र, रामेश्वर आणि त्रिंबकेश्वर आदी मंदिरे आहेत.

पुणतांबा हे गाव शिर्डीपासून जवळच आहे.

(‘असे होते कोपरगांव’ या पुस्तकातून)

About Post Author

Exit mobile version