Home अवांतर टिपण ‘देऊळ’ अन् लवासा

‘देऊळ’ अन् लवासा

0

देऊळ चित्रपटावर समाजात वेगवेगळ्या पातळ्यांवर चर्चा सुरू झाली आहे. यापूर्वी बालगंधर्व चित्रपटामुळे सुरू झालेली चर्चा नॉ‍स्‍टॅल्जिक वर्तुळात अडकून पडली होती, मात्र देऊळसंबंधी वादप्रतिवादातून बौद्धीक खाद्य मिळत आहे. अशा चर्चां घडल्‍याने मराठी समाजाला आलेले बुद्धिचे मांद्य दूर होऊ शकेल.

‘थिंक महाराष्‍ट्र’कडून ‘देऊळ’ची अगाध लीला आणि ‘देऊळ, लवासा आणि विकास’ हे दोन लेख सादर करण्‍यात आले. त्‍यावरून मराठी समाजामध्‍ये वेगवेगळ्या पातळींवर चर्चा सुरू झाली. अशा प्रकारे वादचर्चा घडणे ही मराठी समाजाच्‍या बौद्धिकतेच्‍या दृष्‍टीने आवश्‍यक गोष्‍ट आहे. समाजाची बौद्धिकता वाढीस लागावी, अशी ‘थिंक महाराष्‍ट्र‘ची धारणा आहे. सुलक्षणा महाजन यांच्‍या लेखांवर डॉ. विश्‍वंभर चौधरी आणि प्रवीण महाजन यांनी सणसणीत मते व्‍यक्‍त केली. ती येथे पुर्नउद्धृत करत आहोत.

‘देऊळ’ची अगाध लीला हा दिनकर गांगल यांचा लेख चित्रपटकृती म्‍हणून देऊळसंबंधी अभिप्राय व्‍यक्‍त करतो आणि तेथे दिग्‍दर्शकाऐवजी लेखकच प्रकट होत आहे. असे मत मांडतो. हे चित्रपट माध्‍यमाशी विसंगत आहे. यासंदर्भात संजय भास्‍कर जोशी यांनी देऊळ चित्रपटाचे विश्‍लेषण आमच्‍याकडे पाठवले आहे, हे महत्‍त्‍वाचे वाटते. ‘देऊळ’मधील मुख्‍य व्‍यक्तिरेखेची दिग्‍दर्शक-लेखकाने केलेली मांडणी चित्रपटाचा परिणाम कशी मर्यादीत करते, हे यातून व्‍यक्‍त होते.

यापूर्वी बालगंधर्व या चित्रपटामुळे अशाचप्रकारची चर्चा सुरू झाली. मात्र नितिन देसाई यांची भव्‍य निर्मिती सा-यांच्‍या डोळ्यांचे पारणे फेडून निघून गेली आणि ती नॉस्‍टेल्जिक वर्तुळात अडकून पडली. यावेळी मात्र वादप्रतिवादातून बौद्धीक खाद्य मिळत आहे. समाजाला बुद्धिचे मांद्य आलेले आहे. या मराठीतील न्‍यूनाकडे ‘थिंक महाराष्‍ट्र‘ने आरंभापासून लक्ष वेधले आहे. अशा चर्चांमुळे यातून बाहेर येण्‍याची वाट दिसू लागेल.

संपादक

संपर्क –  info@thinkmaharashtra.com

संबंधित लेख –
‘देऊळ’ – आहे ‘अद्भुत’ तरी…
‘देऊळ’ अन् लवासा
‘देऊळ’ची चर्चा लवासाच्या दारी

About Post Author

Previous article‘देऊळ’ची चर्चा लवासाच्या दारी
Next articleहरी घंटीवाला
दिनकर गांगल हे 'थिंक महाराष्‍ट्र डॉट कॉम' या वेबपोर्टलचे मुख्‍य संपादक आहेत. ते मूलतः पत्रकार आहेत. त्‍यांनी पुण्‍यातील सकाळ, केसरी आणि मुंबईतील महाराष्‍ट्र टाईम्स या वर्तमानपत्रांत सुमारे तीस वर्षे पत्रकारिता केली. त्‍यांनी आकारलेली 'म.टा.'ची रविवार पुरवणी विशेष गाजली. त्‍यांना 'फीचर रायटिंग' या संबंधात राष्‍ट्रीय व आंतरराष्‍ट्रीय (थॉम्‍सन फाउंडेशन) पाठ्यवृत्‍ती मिळाली आहे. त्‍याआधारे त्‍यांनी देश विदेशात प्रवास केला. गांगल यांनी अरुण साधू, अशोक जैन, कुमार केतकर, अशोक दातार यांच्‍यासारख्‍या व्‍यक्‍तींच्‍या साथीने 'ग्रंथाली'ची स्‍थापना केली. ती पुढे महाराष्‍ट्रातील वाचक चळवळ म्‍हणून फोफावली. त्‍यातून अनेक मोठे लेखक घडले. गांगल यांनी 'ग्रंथाली'च्‍या 'रुची' मासिकाचे तीस वर्षे संपादन केले. सोबत 'ग्रंथाली'ची चारशे पुस्‍तके त्‍यांनी संपादित केली. त्‍यांनी संपादित केलेल्‍या मासिके-साप्‍ताहिके यांमध्‍ये 'एस.टी. समाचार'चा आवर्जून उल्‍लेख करावा लागेल. गांगल 'ग्रंथाली'प्रमाणे 'प्रभात चित्र मंडळा'चे संस्‍थापक सदस्‍य आहेत. साहित्‍य, संस्‍कृती, समाज आणि माध्‍यमे हे त्‍यांचे आवडीचे विषय आहेत. त्‍यांनी त्‍यासंबंधात लेखन केले आहे. त्यांची ‘माया माध्यमांची’, ‘कॅन्सर डायरी’ (लेखन-संपादन), ‘शोध मराठीपणाचा’ (अरुणा ढेरे व भूषण केळकर यांच्याबरोबर संपादन) आणि 'स्‍क्रीन इज द वर्ल्‍ड' अशी पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्‍यांना महाराष्‍ट्र सरकारचा 'सर्वोत्‍कृष्‍ट वाङ्मयनिर्मिती'चा पुरस्‍कार, 'मुंबई मराठी साहित्‍य संघ' व 'मराठा साहित्‍य परिषद' यांचे संपादनाचे पुरस्‍कार वाङ्मय क्षेत्रातील एकूण कामगिरीबद्दल 'यशवंतराव चव्‍हाण' पुरस्‍कार लाभले आहेत.

Exit mobile version