थिंक महाराष्ट्र च्या वर्धापन दिनी तीन पुस्तकांचे प्रकाशन
लेखनावर अथवा कलाविष्कारावर सद्यकाळात कोणतेही बंधन जाणवत नाही असा स्पष्ट निर्वाळा लेखक-अभिनेते अभिराम भडकमकर आणि नाट्यदिग्दर्शक कुमार सोहोनी यांनी व्यक्त केला. ते ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’च्या वर्धापनदिन कार्यक्रमातील परिसंवादात बोलत होते. ‘व्हिजन महाराष्ट्र फाउंडेशन’संचालित ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या वेब पोर्टलचा चौदावा वर्धापनदिन अर्थात ‘सद्भावना दिवस 2024’, ठाण्यातील बाळासाहेब ठाकरे स्मारक सभागृहात झाला. महाराष्ट्रातील मराठी माणसाचा चांगुलपणा आणि त्याची प्रज्ञा-प्रतिभा ह्या ‘नेटवर्क’मध्ये नव्या-जुन्या पिढीतील सर्वांनी त्यांच्या लेखणीने, विचारांनी आणि प्रत्यक्ष कार्यक्रमांतूनही योगदान द्यावे असे आवाहन ह्या वेळी करण्यात आले...
फलटणचा संस्कृतिशोध !
फलटण तालुका संस्कृती महोत्सवात स्थानिक परिसरातील मुद्यांना स्पर्श करणाऱ्या बौद्धिक व अनुभवाधारित चर्चा चालू असताना, दुसऱ्या बाजूला वातावरण जत्रेचे, हलकेफुलके होते. माहोल अनौपचारिक गप्पांचा होता. येणारे पाहुणे आणि श्रोतेही प्रदर्शनातील मोजक्याच स्टॉलना भेटी देऊन विविध माहिती गोळा करत होते. आकर्षणे वेगवेगळी होती. त्यात फलटणचा दुष्काळी टापू जलमय कसा झाला येथपासून शहराच्या समस्यांची विद्यार्थ्यांनी मांडणी केली होती, बचतगटाच्या महिलांनी उभे केलेले जग होते, फलटण तालुक्यातील लेखकांच्या पुस्तकांचे प्रदर्शन होते आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे महाराष्ट्र राज्याच्या निवडणूक कार्यालयाने पुरवलेली मताधिकाराची विविध तऱ्हेची माहिती होती...
फलटण तालुका संस्कृती महोत्सव
‘फलटण तालुका संस्कृती महोत्सव’ नावाचा आगळावेगळा ‘इव्हेंट’ संक्रांतीचा मुहूर्त साधून सोमवारी-मंगळवारी (16-17 जानेवारी) फलटणच्या ‘महाराजा मंगल कार्यालया’त साजरा होत आहे. ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’...
संमेलन अध्यक्ष वेगळ्या नजरेतून
सुरेश लोटलीकर यांनी रेखाटलेली व्यंगचित्रे वर्तमानपत्रांतून व मासिकांतून गेली पंचवीस-तीस वर्षे प्रसिद्ध होत आहेत. त्यांच्या व्यंगचित्रांतील राजकीय व सामाजिक भाष्य मार्मिक असते. लोटलीकर हे उत्तम 'कॅरिकेचरिस्ट' ही आहेत. त्यांनी पुल व गांधी यांची रेखाटलेली कॅरिकेचर्स खूप प्रसिद्धी पावली. त्यांना पुस्तकातही स्थान मिळाले...
सत्तातुराणां न भय न लज्जा!
केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात एक प्रतिज्ञापत्र मार्च 2018 मध्ये सादर केले होते, त्यानुसार भारतात खासदार व आमदार यांची संख्या चार हजार आठशेशहाण्णव आहे व...
चांगुलपणा (Goodness)
‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’चा जन्मच महाराष्ट्र समाजातील चांगुलपणा व्यक्त व्हावा म्हणून झालेला आहे. त्या चांगुलपणाचे परमोच्च टोक म्हणजे प्रज्ञा आणि प्रतिभा. म्हणून ‘थिंक महाराष्ट्र...
नव्या युगासाठी नवा अजेंडा!
माणसाच्या मूलभूत गरजा कोणत्या असे कोणी विचारले तर कोणाच्याही तोंडी पटकन येईल, की अन्न, वस्त्र आणि निवारा. पण त्यांची तर परिपूर्ती झाली आहे. देशात...
गझलमधील दार्शनिकता महत्त्वाची!
कवितेला मराठीमध्ये गेल्या तीन-चार दशकांत खूपच मोठा बहर आला आहे. कवितेचे रूपही आत्मनिष्ठेकडून समाजनिष्ठेकडे वळले आहे. त्यामुळे मंचीय कविता नावाचा नवा प्रकार उदयास येऊन...
अभिवाचन – नवे माध्यम!
महाराष्ट्रात ठिकठिकाणी अभिवाचनाचे कार्यक्रम होत असतात. त्यांचे वृत्तांत, बातम्या वर्तमानपत्रांतून अधुनमधून प्रसिद्धही होतात. अभिवाचनात प्रामुख्याने कविता आणि कथा यांचा समावेश असतो. काही ठिकाणी स्वरचित...
चित्रकलेचे बाजारीकरण
चित्रकलेबद्दलची रसिकता संग्राहक ते खरेदीदार ते गुंतवणूकदार अशी बदलत गेली आहे. चित्रकलेचे त्यामधून घडून आलेले बाजारीकरण कोणी रोखू शकणार नाही. खरे तर, ते नैतिकतेचे...