ज्ञानेश्वर भोसले – पारधी समाजातील मुलांसाठी कार्यरत

22
69

ज्ञानेश्वर भोसले या पंढपरपूरच्या तरुणाने केवळ स्वतःचे नव्हे तर अवघ्या पारधी समाजाचे भविष्य उज्ज्वल करण्याचा वसा घेतला आहे. ज्ञानेश्वरचा जन्म पंढरपूरमधील ताडगावजवळच्या जंगलातील. ज्ञानेश्वरने पुढे पोटा-पाण्यासाठी एका गावाहून दुसऱ्या गावात मजलदरमजल करत मोहोळमध्ये बस्तान बसवले. त्याचे शिक्षण जेमतेम दहावी. तेसुद्धा केवळ शिकायचे या जिद्दीने त्याने दहावी गाठली. आईने त्याला आणि त्याच्या सावत्र बहिणींना वाढवले. ती तिच्या मुलांचा गुन्हेगारीशी संबंधही येऊ नये म्हणून पोलिसांची खबरी असल्याचे भासवत राहिली.

ज्ञानेश्वर म्हणतो, माझ्या आईने तीन नवरे केले. म्हणजे मला तीन बाप. पहिल्या बापाला पोलिसांनी पकडले. त्याला सात वर्षांची सजा झाली. माझ्या आईने दुसरे लग्न केले. त्या बापाने आईला सोडल्यानंतर मी सात वर्षांचा असताना आईने परत तिसरे लग्न केले. तो बाप मराठा होता. त्याला पाच मुली होत्या. आईने तीन नवरे केले तरी तिने तिच्या मुलांना वाऱ्यावर सोडले नाही. तिने मुलांच्या पोटापाण्याचा प्रश्न मिटावा, यासाठीच लग्ने केली.

पारधी समाज राहतो तशा पालांवर ज्ञानेश्वर कधीच रमला नाही. त्याने चोरी-गुन्हेगारी विश्वाशी सुतराम संबंधही ठेवला नाही. उलट त्याने वयाच्या पंधराव्या वर्षापासून पारधी समाजासाठी काम सुरू केले. त्याची ओळख भटके विमुक्त समाजासाठी काम करणारे गिरीश प्रभुणे यांच्याशी झाली. त्याचा ध्यास एकच शिक्षणापासून वंचित राहिलेल्या, खोट्यानाट्या केसेस टाकून नाडल्या गेलेल्या त्याच्या जातिबांधवांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणणे. त्यासाठी त्याने 1997 मध्ये ‘भारतमाता आदिवासी पारधी समाज’ व ‘भटके विमुक्त विकास प्रतिष्ठान’ स्थापन केले.

समाजात आवश्यक असलेल्या बदलाची सुरूवात त्याने स्वतःपासूनच केली. रीतीरिवाज व प्रथा यांच्या मागे न लागता त्याने लग्न केले. त्याच दरम्यान त्याची दहावीची परीक्षाही होती. पण पोलिसांनी सतत केसेसमध्ये अडकावल्यामुळे ज्ञानेश्वरचा अभ्यास झाला नाही आणि तो परीक्षेलाच बसला नाही. पुढे, त्याच्यावर डबल मर्डरचा गंभीर गुन्हा दाखल करण्यात आला. त्याला त्या गुन्ह्यात तेरा महिने चौदा दिवसांची कैद झाली. ज्ञानेश्वर म्हणतो, जो गुन्हा मी केलाच नव्हता त्याची शिक्षा मला भोगावी लागली. माझ्याकडे पैसे नव्हते. त्यामुळे मला सोडवणार कोण, हा प्रश्न होताच. वकिलाची फी जमा करण्यासाठी बहीण दारोदारी फिरली. तिने स्वतःला विकले आणि फीचे पैसे उभे केले. समाजातील लोकांची मदत मिळाली नाही. अशा वेळी अपर्णा रामतीर्थकर, दादा इदाते, अरुण करमरकर, गिरीश प्रभुणे यांनी मदत केली.

ज्ञानेश्वरला त्याच्याच समाजातील इतर कैद्यांचे दयनीय जीवन जेलमधील दिवसांत पाहायला मिळाले. पोलिस कैद्यांना अमानुष वागणूक द्यायचे. त्यांना दाढी करण्याचे सामानही पुरवले जात नसे. ज्ञानेश्वर म्हणतो, मी स्वतः पुढाकार घेऊन कैद्यांची दाढी केली आहे. पारधी कैद्यांनाही इतर कैद्यांप्रमाणेच सुविधा मिळाव्यात याकरता सात दिवस अन्नत्याग केला. त्यानंतर जेलमधील कैद्यांना किराणासह केळी, शेंगदाणे, चटणी असं सामान मिळावे यासाठी तीन दिवसांचे उपोषण केले. त्याच दरम्यान सुरेश पवार या कैद्याला काही पोलिसांनी फरशी पुसली नाही, हे निमित्त धरून ठेचून मारले. त्याच्या विरोधात इतर ऐंशी-पंच्याऐंशी कैद्यांच्या मदतीने उपोषण करून त्या तीन पोलिसांना सस्पेंड करण्यास भाग पाडले.

तेथून ज्ञानेश्वरच्या समाजकार्याला सुरूवात झाली. ज्ञानेश्वर कैदेतून बाहेर पडला ते त्याच्या समाजातील लोकांसाठी जिद्दीने लढण्यासाठी आणि त्याच्या समाजातील बांधवांना मानानं जगवण्यासाठी.

ज्ञानेश्वरने 2008 साली सोलापूरमधील दोनशे चौऱ्याऐंशी गावांत पारधी समाजाचे कॅम्प लावून जवळपास चाळीस हजार लोकांना मतदार ओळखपत्रे, रेशनकार्ड, उत्पन्नाचे दाखले, ज्येष्ठ नागरिक दाखले अशी विविध कागदपत्रे मिळवून दिली. हे त्याचे पहिले मोठे यश असल्याचे ज्ञानेश्वर सांगतो.

ज्ञानेश्वरने पारधी समाजातील मुलांच्या शिक्षणासाठी सोलापूरचे जिल्हाधिकारी जगदीश पाटील यांच्या मदतीने मोहोळजवळ दहा गुंठे जागा घेऊन शाळा सुरू केली. मात्र सरकारी नियमानुसार ती शाळा शासनमान्य नसल्याने त्याचे रूपांतर वसतिगृहात करण्यात आले. चार मुलांपासून सुरू झालेल्या त्या वसतिगृहात आता एकशेवीस मुले आहेत. विशेष म्हणजे वसतिगृह कुठल्याही शासकीय निधीशिवाय लोकांच्या मदतीने सुरू आहे. वसतिगृहात पाच प्रकारची मुले राहत असल्याचे ज्ञानेश्वर सांगतो. पहिली म्हणजे ज्यांच्या वडिलांना पंधरा-वीस वर्षांची शिक्षा झाली आहे. दुसरी म्हणजे, ज्यांच्या वडिलांवर अठराहून अधिक केसेस दाखल आहेत. काहींचे पालक असून नसल्यासारखेच. त्या सर्वांचे पालकत्व ज्ञानेश्वरने घेतले आहे. ती मुले जिल्हा परिषदेच्या शाळेत जातात. शासनाचे अनुदान मिळाल्यास पुन्हा शाळा सुरू करण्याचा ज्ञानेश्वरचा मानस आहे.

पारधी समाजातील तरुण तरुणींना आयटीआयमध्ये प्रशिक्षण देण्यासाठी ज्ञानेश्वरने प्रयत्न केले. त्यामधून आयटीआयमध्ये तीन ते चार हजार मुले शिक्षण घेत आहेत. त्याशिवाय पंधराशे कुटुंबांना इंदिरा आवास योजनेतून आदवासींसाठी असलेल्या प्रकल्पांतर्गत घरे बांधून देण्यातही ज्ञानेश्वर यशस्वी ठरला. तो म्हणतो, की प्रत्येक चोरी, दरोड्यामागे पारधी नसतो हेदेखील पोलिसांना पटवून दिले. पोलिसांनीही आश्वासन दिले आहे, की पारध्यांमागे उगाचच लागणार नाही. सोलापूरातील जवळपास सत्तर-ऐंशी टक्के पारधी समाज सुखी समाधानाचे जीवन जगत आहे.

ज्ञानेश्वरने आदिवासी विकास योजने अंतर्गत पारधी समाजाला बावीसशे हेक्टर बागाईत वा जिरायत जमीन मिळावी यासाठीचा प्रस्ताव तयार केला आहे. त्या प्रस्तावाला मंजुरी मिळावी यासाठी सध्या ज्ञानेश्वर मंत्रालयात चकरा मारत आहे. ज्ञानेश्वरला समाजकार्यासाठी ‘नातू फाऊंडेशन’ व ‘म्हाळगी ज्ञान प्रबोधिनी’चा पुरस्कार मिळाला आहे. तसेच ‘प्रिसिजन ग्रूप’चा एक लाख रुपयांचा कृतज्ञता पुरस्कारासह इतरही अनेक पुरस्कारांनी ज्ञानेश्वरला सन्मानित करण्यात आले आहे.

ज्ञानेश्‍वर भोसले
9923969198

माहिती संकलन – श्रीकांत पेटकर
शब्दांकन – अर्चना राणे
archanaarane@gmail.com

About Post Author

22 COMMENTS

  1. ज्ञानेश्वर भोसले यांनी पारधी
    ज्ञानेश्वर भोसले यांनी पारधी समाजाला ओळख देण्यासाठी फार छान काम केले आहे. त्यांना शुभेच्छा.
    तसेच पेटकर यांनी भोसले यांना प्रसिद्धी दिल्याबद्दल त्याचेही मनापासून आभार

  2. Dyneswar Bhosale, yanni
    Dyneswar Bhosale yanni paradhi samajasathi kelele kary molache aahe. Tyamule paradhi samaj mukhy pravahat yeail, Tyachyavar tya jati vyavasthe madhye aslela kalanka pusun nighel. Ya var maza tham vishwas aahe.
    Petker sheb, hi mahiti pudhe aanalya baddal tumche hardik abhar!

  3. पेटकर बहुत हि अच्छा काम कर
    पेटकर बहुत हि अच्छा काम कर रहे है .

    • थिंक महाराष्ट्र या वेब पोर्टल
      ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’ या वेबपोर्टलमुळे ही सर्व माहिती पुढे येत आहे व अशा अनेकांची माहिती प्रकाशात आणली जाणार आहे. हे पोर्टल सर्वसामान्यापर्यंत नेण्यासाठी सर्वांनी मदत करावी. कारण अशा गोष्टी ऐकल्याने वाचल्याने आपला फायदाच होईल. Positive विचारांच्या लहरी आपल्‍या आसपास निर्माण होणे गरजेचे आहे. धन्यवाद.

  4. नविन काीहीतरी या portal वर
    नवीन काहीतरी या portal वर वाचायला मिळतंय…. खूपच छान!!!!!!!!

  5. ज्ञानेश्वर भोसले

    ज्ञानेश्वर भोसले यांनी पारधी समाजाला ओळख देण्यासाठी फार छान काम केले आहे. त्यांना शुभेच्छा.

  6. Dnyaneshwar bhosale yanni
    Dnyaneshwar bhosale yanni kelele karya he ajachya jagala badalnya sathi khup molache ahe. Tyanni Swatahavar jhalelya anyavar ani sankatanvar mat karun n dagmagta Ek khambir netrutwa kele ahe.

  7. outstanding work of Paradhi

    outstanding work for Paradhi and thanks for starting this web portal.

  8. ज्ञानेश्वर चे कार्य जबरदस्त
    ज्ञानेश्वरचे कार्य जबरदस्त आहे. पारध्याच्या कपाळावरील गुन्हेगारीचा शिक्का मिटवण्यासाठी तो अविश्रांत मेहनत करीत आहे. त्याला खूप शुभेच्छा.

  9. आवडले.

    आवडले.
    अशा वेब पोर्टलची भविष्यात गरज आहे.
    पुस्तके, पेपर्स राहतील कि नाही शंका आहे.
    तेव्हा हे वेबपोर्टल ज्यांनी सुरु केले . ते ग्रेटच…

  10. थिंक महाराष्ट्र चे काम खरोखर
    थिंक महाराष्ट्रचे काम खरोखर मोठे आहे. पण पेपेरातही,T.V.तही याची बातमी यायला हवी. सर्व सामान्यांना कळायला हवंच.
    शुभेच्छा.

  11. भोसले तुम्ही पारधी समाजासाठी
    भोसले तुम्ही पारधी समाजासाठी एक तारा आहात तुमच्या कडून भरपूर अपेक्षा आहे

  12. Inspiring work of Bhosale.

    Inspiring work of Bhosale.
    Outstanding persanality are coming in frontline onlt due to Thinkmaharashtra.com
    very good work

  13. PARADHI YANCHE

    PARADHI YANCHE ‘CHAUDA MAHAINE…TERA DIVAS’ HE PUSTAK ” GRANTHALI ” PUBLICATION NE PUNRMUDRAN KARUN BAJARAT AANALE AAHE.

  14. CHAUDA MAHINE TERA DIVAS HE
    CHAUDA MAHINE TERA DIVAS HE PUSTAK GRANTHALI PUBLICATION MUMBAI TARFE PRASIDDHA HOT AAHE.

  15. आपले काम खूपच छान व सूंदर आहे
    आपले काम खूपच छान व सुंदर आहे.

  16. Dnyaneshwar bhosale yanna
    Dnyaneshwar bhosale yanna tyani pardhi samaja sathi kelelya karyabadal aani pudhe karnarya samaj karyakarita khup khup subhecha.

Comments are closed.