Home वैभव कोल्हापूर-मिरज रेल्वेचा आरंभ !

कोल्हापूर-मिरज रेल्वेचा आरंभ !

छत्रपती शाहू महाराज यांच्या पुण्यतिथीचे 2022 हे शताब्दी वर्ष आहे. जे कोल्हापुरात कृतज्ञता पर्व म्हणून साजरे केले जात आहे. शाहू महाराज यांचा कोल्हापूर संस्थानाचा राजा म्हणून राज्याभिषेक त्यांच्या वयाच्या विसाव्या वर्षी झाला. त्यांनी त्यानंतर, दुसऱ्या दिवशीच संस्थानाचे लोककल्याणकारी काम म्हणून कोल्हापूर ते मिरज या रेल्वेमार्गाची पायाभरणी केली होती. तो प्रकल्प त्यांच्या जिद्द व चिकाटीमुळे अवघ्या तीन वर्षांत पूर्णत्वास गेला. एक राजा लोहमार्ग बांधतो, याचेच सगळ्यांना अप्रूप होते !

शाहू महाराज यांचा कोल्हापूर संस्थानाचा राजा म्हणून राज्याभिषेक त्यांच्या वयाच्या विसाव्या वर्षी2 एप्रिल 1894 रोजी झाला. त्यांनी त्यानंतरदुसऱ्या दिवशीच संस्थानचे लोककल्याणकारी काम म्हणून कोल्हापूर ते मिरज या रेल्वेमार्गाची पायाभरणी केली होती. तो शाहू महाराज यांचा पहिला जाहीर समारंभ होता. त्यांनी चांदीचे खोरे वापरून कोल्हापूर स्टेट रेल्वेच्या कार्यास प्रारंभ केलाते भाषणात म्हणाले, “सर्व लोकांच्या संबंधीचे काम करण्याचा हा माझा पहिलाच प्रसंग आहेत्या कामी आपण मला मेहेरबानी करत आहातत्याबद्दल मी आपले आभार मानतोजे थोडेबहुत शब्द बोलण्यास मला सुचवले आहेते मी बोलण्याचा प्रयत्न करतोहे आगगाडीचे काम तडीस गेल्याने माझ्या राज्याची संपतिसाधने वाढण्याच्या कामी त्याचा फायदेशीर परिणाम होईल. माझी उमेद आहेकी साहजिक रीतीने घडून येणाऱ्या क्रमाप्रमाणे आजपासून तीन वर्षांच्या आत हा आगगाडीचा रस्ता करण्याचे काम माझ्या हातून होईल.

कोल्हापूरमिरज रेल्वेमार्ग योजना मुंबई सरकारने फेब्रुवारी 1879 मध्ये मंजूर केलीते काम लवकर पूर्ण करण्याचा संकल्प कोल्हापूर संस्थानच्या कौन्सिल ऑफ ॲडमिनिस्ट्रेशन यांनी घेतलातेव्हा कोल्हापूर संस्थानचे रिजंट म्हणून राजर्षी शाहू महाराजांचे जनक पिता जयसिंगराव ऊर्फ आबासाहेब घाटगे होते.

भारतात रेल्वे सेवा 1849 साली सुरू झालीती जबाबदारी जी.आय.पीरेल्वे म्हणजेच ग्रेट इंडियन पेनिन्सुला रेल्वे कंपनीने घेतली होती. त्यानंतर काही वर्षांनी ब्रिटिश सरकारने दौंडपुणे येथून एक रेल्वेमार्ग साताराकोल्हापूरबेळगावगोवाहुबळी व बंगळूरला जोडण्याची योजना तयार केली.

कोल्हापूर स्टेट रेल्वे प्रकल्पाचे अठ्ठेचाळीस किलोमीटर म्हणजे अठ्ठावीस मैल लांबीच्या प्रकल्पाचे भूमिपूजन गुरूवारी 3 मे 1888 ला सायंकाळी साडेपाचला शाहूपुरीतील माळरानावर म्हणजेच सध्याच्या कोल्हापूर रेल्वे स्थानकाच्या ठिकाणी झालेकार्यक्रमास खास निमंत्रित म्हणून युरोपीयन अधिकारीसंस्थानचे मानकरीअधिकारी व व्यापारी मोठ्या संख्येने उपस्थित होतेत्या रेल्वे प्रकल्पाच्या प्राथमिक खर्चाचा अंदाज बावीस लाख पंच्याहत्तर हजार रुपये होतारेल्वेमार्ग बांधणीसाठी मुख्य अभियंता म्हणून आर.जेशानन यांची कोल्हापूर संस्थानाने नेमणूक केली आणि कोल्हापूर स्टेट रेल्वे नावाने ती योजना आखली गेली.

कोल्हापूर दरबारने कोल्हापूर ते मिरज हा अठ्ठेचाळीस किलोमीटरचा मार्ग तीन वर्षांच्या कालावधीत बांधण्यात यश मिळवलेपंचगंगा आणि कृष्णा या नद्यांवरील छोटेमोठे पूल व मोऱ्या यांची संख्या पंच्याहत्तरवर गेलीप्रकल्प तीन वर्षांत पूर्णत्वास गेलात्यावरून कोल्हापुरी जिद्द व चिकाटी दिसून आलीएक राजा लोहमार्ग बांधतोयाचेच सगळ्यांना अप्रूप होते !

या रेल्वेमार्गासाठी स्लिपर लाकडी वापरण्याचे सुरुवातीस ठरवले होतेपण नंतर लोखंडी स्लिपर वापरावे अशी योजना झालीत्यामुळे वाढीव आर्थिक तरतूद करणे आवश्यक ठरलेअपेक्षित खर्च बावीस लाख बहात्तर हजार दोनशेपन्नास रूपयांवरून तेवीस लाख पाच हजार एकशेतेवीस रुपयांपर्यंत वाढलाशाहू महाराजांनी त्यांच्या संस्थानाच्या विकासाविषयीची तळमळ व महत्त्वाकांक्षा यामुळे हे मोठे कार्य निर्विघ्नपणे पार पाडलेत्या कार्यासाठी मिरजेच्या राजेसाहेबांची हद्द कृष्णा नदीपर्यंत होतीतो मार्ग त्यांच्या अखत्यारीत असूनही त्यांनी या कामी सक्रिय सहकार्य केले.

कोल्हापूरमिरज रेल्वेमार्गावर सुरुवातीला रूकडीहातकणंगले व उदगाव ही तीन स्थानके होतीउदगाव स्थानकाचे नामकरण शिरोळ रोड असे कालांतराने झालेशाहू महाराजांनी त्यांचे जनकपिता जयसिंगराव यांच्या स्मृतिनिमित्त जयसिंगपूर गाव 1917 मध्ये वसवलेतेव्हा शिरोळ रोडचे जयसिंगपूर रेल्वे स्थानक असे नामांतर झालेरूकडीजवळ पंचगंगा नदीवरतसेचउदगावनजीक कृष्णा नदीवर दोन मोठे पूल बांधले गेले.

रेल्वे सुरू झाली तेव्हा डब्यात फक्त बसण्याची सोय होतीविजेचे दिवे व पंखे नव्हतेतीन वर्ग फर्स्ट क्लाससेकंड क्लास आणि थर्ड क्लास असे होतेथर्ड क्लासच्या डब्यात मलमूत्र विसर्जनाची सोय नव्हतीयुरोपीयन लोकांसाठी स्वतंत्र डबा असेकोल्हापूररूकडी दोन आणेहातकणंगलेसाठी दोन आणे नऊ पैसेजयसिंगपूरला चार आणे नऊ पैसे व मिरजेस सहा आणे तीन पैसे असे तिकिट दर होतेकोल्हापूर स्टेट रेल्वे या नावाने ओळखली जाणारी ती रेल्वे कालांतराने मद्रास आणि सदर्न मराठा रेल्वेच्या तर ऑक्टोबर1966 पासून दक्षिण मध्य रेल्वेच्या आणि 1 एप्रिल 2004 पासून मध्य रेल्वेच्या पुणे विभागाच्या नियंत्रणाखाली आहे.

भारत देश 1947 ला स्वतंत्र झाल्यानंतर मीटरगेज मार्गाचे रूंदीकरण करण्याचे ठरले.  पुणेमिरज रेल्वेमार्गाचे रूंदीकरण ब्रॉडगेजमध्ये करण्याचे 1968 मध्ये निश्चित झालेपण कोल्हापूरमिरज रेल्वेमार्ग मीटरगेजच राहणार होतात्यावेळी शाहूपुरी मर्चंटस असोसिएशनचे शांतिनाथ पाटणेबाबूभाई पारीख व कोल्हापूर नगरपालिका यांनी याही मार्गाचे रूपांतर ब्रॉडगेजमध्ये करावे अशी आग्रही मागणी केलीत्याचा परिणाम म्हणून कोल्हापूरमिरजपुणे रेल्वेमार्गाचे ब्रॉडगेज रूपांतर देशाचे गृहमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते 7 नोव्हेंबर 1968 ला झाले आणि कोल्हापूरमिरज या मार्गावरील मीटरगेजची शेवटची गाडी 9 मे 1971 ला सुटली. कोल्हापूरमुंबई मार्गावरील प्रतिष्ठेची महालक्ष्मी एक्सप्रेस 11 मे 1971 रोजी धावू लागलीत्यावेळी रेल्वेमंत्री सी.एमपुनाचामुख्यमंत्री वसंतराव नाईक व शांतिनाथ ऊर्फ तात्यासाहेब पाटणे यांच्या उपस्थितीत मिरज येथे समारंभ झालाकोल्हापूरमिरज मार्गाचे रूपांतर ब्रॉडगेजमध्ये झाल्यानंतरश्री शाहू मार्केट येथे मालवाहतुकीसाठी गुड्स यार्ड गूळ मार्केट या नावाने उभारले गेले.

– रावसाहेब पुजारी 9322939040 sheti.pragati@gmail.com

———————————————————————————————-

About Post Author

2 COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version