रवांडा हा मध्य आफ्रिकेतील हृदयात वसलेला छोटासा देश. जगाच्या नकाशात पाहिले तर छोटा बिंदू; पण, खरे तर, मूर्ती लहान कीर्ती महान! हे मी स्वतः अनुभवत आहे. मी मुंबईहून येथे वास्तव्यास 2015 साली आले. ‘लँड ऑफ थाउजंड हिल्स’ अशी त्या देशाची स्तुती मी ऐकून होते. तशीच प्रचिती येत आहे या देशाची. स्वच्छता आणि हिरवळ यांवर या देशाचे असलेले प्राधान्य वाखाणण्याजोगे आहे. किगली ही रवांडाची राजधानी आहे. त्या शहराला तर आफ्रिका खंडातील ‘क्लीन सिटी’ हा पुरस्कार 2008 साली मिळाला.
रवांडा रोबोट ट्रीटमेंट प्लॅन
|
जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना संकटाची कल्पना रवांडाला वेळीच पूर्णपणे आली होती आणि त्यानुसार त्यावेळीच वैद्यकीय कर्मचाऱ्यांची नेमणूक विमानतळावर करण्यात आली. ते बाहेरून येणाऱ्या प्रवाशांची चाचणी करत. मुंबईहून परतलेले भारतीय जोडपे कोरोनाबाधित असल्याचे 14 मार्चला जाहीर झाले.
पोर्टेबल वॉश बेसिन बस स्थानक
|
रवांडाने 21 मार्चला लॉकडाऊन जाहीर केला. आफ्रिकेतील मर्यादित वैद्यकीय सुविधा आणि अतिदक्षता विभागातील अपुऱ्या सेवा यांचे गांभीर्य रवांडाने वेळीच लक्षात घेतले. गर्दीची ठिकाणे – बसस्थानके, दुकाने, भाजीमंडई – येथे हात धुणे, मास्क घालणे बंधनकारक केले गेले. सार्वजनिक ठिकाणी हात धुण्यास सोयीस्कर अशा पोर्टेबल वॉशबेसिनची सुविधा करण्यात आली. सोशल डिस्टन्ससाठी दुकानात गर्दी करणे रोखण्यात आले. रवांडासारख्या छोट्या देशात वैद्यकीय कर्मचाऱ्यांच्या मदतीसाठी आणि कोरोनाबाधितांच्या सेवेसाठी रोबो आणण्यात आले. त्यामुळे डॉक्टर्स, परिचारिका यांना कोरोनासंसर्ग कमी झाला. लॉकडाऊननंतर जीवनावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या. देशाची आर्थिक परिस्थिती लक्षात घेता, सरकारने व्यापारी समुदाय आवश्यक सुविधांचे दर वाढवणार नाही याची पूर्ण काळजी घेतली. त्यामुळे आम्हाला गोष्टींचा तुटवडा कधीच जाणवला नाही.
माझे पती रोशन हे आफ्रिकन इथिओपियन एअरलाईन्समध्ये कार्यरत आहेत. विमानतळ बंद आहेत, त्यामुळे त्यांच्या कामावर कोविद-19चा फार मोठा परिणाम झाला आहे. तरीही दरम्यानच्या काळात रवांडाने काही खाजगी विमाने युरोपीयन/अमेरिकन नागरिकांसाठी पाठवण्याचे महत्त्वपूर्ण काम केले. त्याच प्रमाणे रवांडाने लॉकडाऊनच्या काळात युरोपमध्ये अडकलेले विदयार्थी मायदेशी आणण्यासाठी खास विमानेही पाठवली. त्यातून आलेल्या साऱ्या प्रवाशांना विलगीकरण कक्षात ठेवण्यात आले. रवांडामधील जनताही सरकारी नियमांचे कटाक्षाने पालन करते. त्याचे पॉझिटिव्ह परिणाम दिसून आले.रवांडामध्ये कोविद-19चा सामुदायिक फारसा झाला नाही, जवळ जवळ एक महिन्याच्या लॉकडाऊननंतर 4 मे रोजी सर्व कामकाज हळूहळू पूर्ववत करण्याचे सरकारने जाहीर केले. कोरोनाचे रवांडामध्ये एकूण सहाशेसेहेचाळीस रुग्ण आढळले आहेत, त्यांपैकी साडेतीनशे रुग्ण पूर्णपणे बरे झाले आहेत. देशात कोरोनाचे दोन मृत्यू झाले आहेत. अत्यावश्यक सेवेतील कोणीही आजारी वा मृत नाही. वेळेत घेतलेले सरकारी निर्णय आणि लोकांची शिस्त यांमुळे रवांडा लवकरच कोरोनावर मात करू शकेल ही आशा आहे. जगभरची या डोळ्यांना न दिसणाऱ्या शत्रूच्या विळख्यातून सुटका होवो अशी प्रार्थना करते.
आरती सुपे आणि पती रोशन सुपे |
मी मुंबईतील साठ्ये महाविद्यालयातून मायक्रोबायोलॉजी विषयातील पदवी घेतली आहे. मी हिंदुजा हॉस्पिटलमध्ये रेस्पिरेटरी टेक्निशियन म्हणून अतिदक्षता विभागात काम करत होते. तेथे डॉक्टर, नर्स आणि आपत्कालीन विभागातील कर्मचारी या सर्वांकडून बरेच काही शिकले. त्यामुळे सध्या सुरू असलेल्या कोविदवरील उपचारात त्या सर्वांवर येणारा ताण मी समजू शकते. पुढे, मी हॉस्पिटल मॅनेजमेण्टचे शिक्षण पूर्ण केले व व्यवस्थापन विभागात काम करू लागले. मी मुंबईतील फोर्टिस हॉस्पिटलमध्ये इंटरनॅशनल पेशंट केअर या विभागात आफ्रिकेतील विविध देशांतूनआलेल्या लोकांना मदत करत होते. त्यात रवांडाचे नागरिकही असत. रवांडामध्ये आल्यावर, मी काही वर्षे येथील क्लिनिक्समध्ये व्यवस्थापन विभागात काम केले. पुढे, मुलगी झाल्यावर थोडा ब्रेक घेतला आहे.
किगली कन्व्हेन्शन सेंटर समोरील भ्रष्टाचार विरोधी शिल्पकृती |
रवांडा येथील क्लिनिक आणि आरती यांचे सहकारी |
रवांडा हा छोटासा पण वैशिष्ट्यपूर्ण देश आहे. रवांडाची लोकसंख्या फक्त एक कोटी तीस लाख आहे. तो देश भारतातील केरळपेक्षाही क्षेत्रफळाच्या दृष्टीने छोटा आहे. रवांडामध्ये 1994 साली दोन वेगळ्या जातींमधील अंतर्गत वादाने युद्ध पेटले. त्याने अतिशय गंभीर रूप घेतले. म्हणून त्याला जेनोसाइड असेच म्हणतात. तो वंशसंहार शंभर दिवस चालला. त्यात दहा लाख
– आरती सुपे aarti.c.chavan@gmail.com
————————————————————————————————————
रवांडामधील किगली शहर |
वेगळाच अनुभव आहे. लेख आवडला
आफ्रीका खंडातला एवढा छोटा देश .ह्याची बरीच माहिती या लेखाद्वारे मिळाली .आपला देश सोडून अशा अपरिचित देशात जाऊन स्थिरस्थावर होणे खरोखरच कौतुकास्पद वाटते .लेख छान माहितीपूर्ण. सौ.अंजली आपटे .
लेख छानचं. माहिती मिळाली.
Waah chan..
खूप सुंदर लेख…जगाच्या नकाशावरील एक छोटासा देश..पण या लेखामुळे त्या देशाची छान ओळख झाली.
Khup chan di👌🏻👍🏻
Ati sundar lekhan ani chan vishleshan kelay
खूप छान!
लेख वाचून रवांडा विषयी माहिती तर मिळालीच,पण एक ओढ निर्माण झाली.
खूप छान माहिती मिळाली!
खूप छान लेखन व प्रस्तुती, अभिनंदन.
Great share!! Amazing write-up!! Stay healthy.. Stay safe!!!!
Very informative, This tiny country on the map is leading africa in many ways !
Khup Chan Aarti
Very well written Aarti 👍 and so much informative 😊 looking forward for more such blogs from you 👌
नमस्कार, आरती व रोशन सुपे मी अशोक शिंदे. किगालीला माझी मुलगी 'नेहा ' व जावई 'पंकज 'हे स्थायीक आहेत. पाच वर्षांपूर्वी आम्ही तेथे आलो होतो. तेथील सौंदर्य, शिस्तबद्धता, स्वछता, माणुसकी, वातावरण हे वाखाणण्याजोगे आहे. आणि हो आरती मॅडम, आपला लेख खुपच छान आहे. या निमित्ताने आपल्या महाराष्ट्रातील जनतेला खुप चांगली माहिती मिळाली. धन्यवाद. ������
Thoughts very well explained ����
Very informative and nice
Blog is very Informative. Mindset of our Indians about African counties are not well. This blog will help people to understand the real facts. NICE BLOG. KEEP IT UP AARTI
Dear Aarti, very well written. You are making us proud and happy to be part of our small nd sweet marathi community in kigali. Jai Maharashtra����
Nicely written…!! ✌🏻
धन्यवाद !!
धन्यवाद !!
धन्यवाद !!
धन्यवाद !!
धन्यवाद !!
धन्यवाद !!
धन्यवाद !!
धन्यवाद !!
धन्यवाद !!
Thank u so much !!!
धन्यवाद !!
धन्यवाद !!
धन्यवाद !!
Thank you so much Mr.Nitin Athawde . And it’s always pleasure to be a part of Kigali & definitely our Marathi Community.Jai Hind ,Jay Maharastra 🙏
Thank you so much Mr.Atul Lanjulkar for all inspiration. I have tried my best to take our people close to Africa .
Thank you so much !!!
धन्यवाद !!अंजली मॅडम ..
Thank you so much Mr. Swapnil Karkhile. It’s very true as vision of this country is wide so they will decently go so high soon !!!
Thank you so much !!!
धन्यवाद !!! नमस्कार काका 🙏 इतका छान अभिप्राय दिल्या बद्दल.. आम्ही तुम्हा सर्वांची किगाली ट्रिप पुन्हा केव्हा प्लॅन होते आहे त्याची वाट पाहतो आहे ..भेटू लवकरच !! काळजी घ्या !!
Thank you so much Ms. Prachi Karekar
Very nice …👌
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
फार सुंदर लेख. एका छोट्या पण छान देशाची माहिती कळली.सौ.अनुराधा म्हात्रे. पुणे
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
Very nice aarti ..keep writing 👍😊
Perfectly written about Rwanda Aarti, congratulations on your first and beautiful blog, keep writing. Sonali
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
Thank you so much !!!!
Thank you so much Mrs Sonali Athawde for all appreciation!!
Thank you so much !!!
धन्यवाद अनुराधा मॅडम 🙏
छान लिखाण केले आरती . रवांडाचा इतिहास तसेच तेथील administration,कामातिल तत्परता तसेच तेथील शिस्तबद्धता विषयी भारतीयांना नक्कीच जाणीव होईल व आफ्रिकन लोकांविषयीचा गैरसमजही दूर होईल . आरती तुझे मनापासून अभिनंदन.
ही टिप्पणी लेखकाना हलविली आहे.
रवांडा म्हणजे जेनोसाईड इतकेच माहित होते. नवी माहिती मिळाली. धन्यवाद.
धन्यवाद !!!
धन्यवाद !! आशीर्वाद असावा 🙏
धन्यवाद !!
दोन देशांमधला व्यवस्थापनतील फरक हा तेथील वास्तव्याने कळतो आणि त्या देशाच्या सूज्ञ नागरिक म्हणून महत्वाची भुमिका बजावतो…उत्तम नियोजन.सुंदर लेख…राकेश चव्हाण
ध्यानवाद !!!
ध्यानवाद !!!
अत्यंत सुरेख लेख आणि नियोजय त्याहुनी उत्तम
Good article. Lot of misconceptions about Africa could be cleared.अनघा गोडसे. ऑस्ट्रेलिया..माझ्या what's ap आली ती पुढे फॉरवर्ड करत आहे.संध्या जोशी
धन्यवाद !!!
धन्यवाद !!! गोडसे मॅडम
आज जर सावकाशपणे हा सुंदर लेख परत वाचला. खरंच आरती तुझं मनापासून कौतुक. रवांडा देश म्हणजे एक दुर्मिळ उदाहरण आहे. फिनिक्स आहे आणि कोरोना असो किंवा दुसरे कुठले संकट , हा देश मेहनत आणि शिस्तप्रियतेच्या बळावर प्रगती पथावर अग्रेसर आहे. आरती पुन्हा एकदा अभिनंदन आणि लेखन करीत रहा. You definitely have it within you. All the best.
धन्यवाद !!! अनघा मॅडम ..
खूपच सुंदर आरतीतिकडे राहून तू मराठी विसरली नाही हे महत्वाचेतू एवढं छान आणि सोप्या भाषेत लिहिलंस की एखाद्या लहान मुलाला ही सहज कळे आपण जिथे राहतो त्या देशाचा आदर आपण केला पाहिजे हे तू दाखवून दिलेकाळजी घ्या धन्यवाद