रवांडा हा मध्य आफ्रिकेतील हृदयात वसलेला छोटासा देश. जगाच्या नकाशात पाहिले तर छोटा बिंदू; पण, खरे तर, मूर्ती लहान कीर्ती महान! हे मी स्वतः अनुभवत आहे. मी मुंबईहून येथे वास्तव्यास 2015 साली आले. ‘लँड ऑफ थाउजंड हिल्स’ अशी त्या देशाची स्तुती मी ऐकून होते. तशीच प्रचिती येत आहे या देशाची.