Home वैभव गावांच्‍या अंतरंगात इगतपुरीचा नवरा-नवरीचा डोंगर

इगतपुरीचा नवरा-नवरीचा डोंगर

15
carasole

नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यातील कुशेगावजवळ नवरा-नवरीचा डोंगर प्रसिद्ध आहे. गिर्यारोहणासाठी लोकांना आवडेल असे ते ठिकाण आहे. ‘डोंगराच्या कुशीत वसलेले’ म्हणून त्या गावाचे नाव कुशेगाव. नाशिकहून वाडीवऱ्हे फाटा येथून वळले, की पश्चिमेकडे वीस किलोमीटर अंतरावर कुशेगाव लागते. गाडी कुशेगावला पार्क करून डोंगराच्या दिशेने पायी जावे लागते. डोंगर दुरून विलोभनीय दिसतो.

कुशेगावाच्या उत्तरेला पूर्व-पश्चिम पसरलेली डोंगररांग आहे. त्या डोंगररांगेच्या पूर्व टोकावर दोन सुळके आहेत. ते सुळके म्हणजे जणू नवरा-नवरी जोडीने उभे आहेत असे वाटते. म्‍हणून त्या सुळक्यांना ‘नवरा-नवरी’ असे म्हटले जाते.

कुशेगावातून वाटाड्या सोबत घ्यावा. त्या डोंगररांगेच्या मध्य भागात खिंड आहे. खिंडीच्या दिशेने चालत गेल्यास टेकडीचा एक टप्पा पूर्ण करून पुढे ती पायवाट मुख्य डोंगराकडे जाते. कड्याच्या दिशेने चालत गेल्यावर सुरुवातीला घनदाट जंगल लागते. भवतालची हिरवीगार गर्द झाडी, पक्ष्यांचे आवाज मन मोहून टाकतात. पायवाटेपासून जवळच डोंगरउतारावरून वाहणा-या पाण्याचा खळखळाट ऐकू येतो. पुढे, मुख्य डोंगराची चढण हिरव्यागर्द झाडीतून सुरू होते. तो भाग चढून आल्यावर, कड्याजवळ पोचल्यावर खरी गंमत येते. तो कडा म्हणजे वेगळा भूआकार आहे. कडा दुभंगून कड्यात फट निर्माण झालेली आहे. ती पाच ते सहा फूट रूंद व पंचवीस ते तीस फूट उंच आहे. त्या उंच, अरूंद फटीतून पायवाट जाते. फटीच्या टोकावर मोठी दगडी शिळा अडकलेली दिसते. त्या ठिकाणी पोचल्यावर सगळा थकवा दूर होतो. थंडगार हवा व निसर्गसौंदर्य मनाला मोहून टाकते.

कड्याच्या उंच, अरूंद फटीतून पुढे गेल्यावर पर्यटक शिखरावर पोचतो. तेथून अंजेनेरी, ब्रम्हगिरी व इतर डोंगररांगा दिसतात. वैतरणा व मुकणे धरण दिसतात. चोहोबाजूला असलेला हिरवागार नयनरम्य निसर्ग मनाला तजेला देतो. डोंगराच्या बाजूला कड्याला लागूनच मोठी घळई आहे. ती पायवाट त्या खोल घळीतून पुढे जात डोंगराच्या विरूद्ध बाजूला खाली उतरत जाते. पर्यटक अशा प्रकारे संपूर्ण डोंगररांग पार करून त्र्यंबकेश्वर गावाच्या दिशेने खाली उतरतो. तो प्रवास पाच ते सहा तासांत पूर्ण होतो. ते पदभ्रमण अतिशय रमणीय असते.

– प्रा. सीताराम. आर. निकम

Last Updated On 3rd March 2017

About Post Author

15 COMMENTS

  1. Nashik jilhayat sudhaa one
    Nashik jilhayat sudhaa one day trip sathi ani trecking sathi khup option ahet….he lekhatun samjte..lekh atishay chan ahe.

  2. निसर्गप्रेमी निकम सर आपल्या
    निसर्गप्रेमी निकम सर आपल्या बरोबरचा पर्यटनाचा अनुभव खरोखरच नितांत सुंदर असतो आपले नियोजन, भौगोलिक ज्ञान आणि सहलीचे वेळापत्रक शिस्तबध्द असते. आपले लेखन आणि प्रवास वर्णन प्रवाही आहे ते असेच अविरतपणे प्रवाही सुरु राहावे व तुमच्या सोबत नवनवीन नावीन्यपूर्ण स्थळे आम्हास पाहण्याचा योग जुळून यावे यासाठी अनंत शुभेच्छा!

  3. लेख फारच सुंदर आहे मला फारच
    लेख फारच सुंदर आहे मला फारच आवडला मी या ठिकाणी जरूर भेट देणार आहे .

  4. सप्रेम नमस्कार …

    सप्रेम नमस्कार …
    अतिशय छान माहिती आटोपशीर शब्दात पण पूर्ण आकलन होईल अशा पध्दतीने मांडणी केलेलीआहे.
    पुढील माहितीपूर्ण लेखाची वाट पाहतो.
    अभिनंदन व .धन्यवाद .

  5. अतिशय सुंदर वर्णन केले होते
    अतिशय सुंदर वर्णन केले होते .त्यामुळे साहजिकच तेथे जाण्याची ईच्छा होते।

  6. Very useful information the
    Very useful information the development of tourism in Igatpuri tahsil. Congratulations to Author and publisher.

  7. लेख फारच सुंदर आहे. मी या
    लेख फारच सुंदर आहे. मी या ठिकाणाला नक्की भेट देईल.

  8. Sundar thikan … bagtana
    Sundar thikan … bagtana atishay aanad vattl… prt prt janychi eccha vatel

  9. Sir
    माहिती खूप सुंदर आहे गाव…

    Sir,
    माहिती खूप सुंदर आहे गाव खूप छान आहे पण आमदार, खासदार यांचा कडून दुर्लक्ष होणारे गाव आहे. वाडीवरहे,पहिने गावाची शेवटचे टोक
    जसा विकास होयला पाहिजेत तो होत नाही, पाणी,लाईट,रस्ते नाही काही पाड्या वर लाईट ,येण्या जाण्या साठी रस्ते नाही.

  10. गावाचा विकास होणे गरजेचे
    गावाचा विकास होणे गरजेचे.

  11. कुशेगाव नाशिक जिल्ह्याच्या…
    कुशेगाव नाशिक जिल्ह्याच्या इगतपुरी तालुक्यात आहे पण तेथील डोंगर हे नाहीत या डोंगरांचा फोटो लेखात दिलेल्या जागेवरून काढलेला आहे ब्रह्मगिरीच्या प्रदक्षिणेला जात असताना पेगलवाडी गाव ओलांडल्यानंतर छोटासा घाट लागतो तेथे डाव्या बाजूला अंजनेरीचा डोंगर व उजव्या बाजूला फोटोतील उजव्या बाजूचा डोंगर दिसतो थोडं पुढे गेल्यावर पहिने गाव लागलं की डाव्या बाजूला लेखातील नवरा नवरी डोंगर किंवा पहिने चा डोंगर व उजव्या बाजूला फोटोतील दिसणारे सर्व डोंगर दिसतात. पुढे एक वाट घोटी कडे जाते व दुसरी वाट खोडाळा कडे.
    या डोंगरावर तुम्ही पेगलवाडी कडून पहिने मार्गे किंवा अंजनेरी कडून मुळेगाव मार्गे किंवा वाडीवऱ्हे कडून मुळेगाव कुशेगाव मार्गे जाऊ शकतात.
    लेखात सांगितलेली बाजू ही अग्नेय दिशेची बाजू आहे. तेथून त्र्यंबकेश्वर कडील डोंगररांगेचा फोटो काढला आहे. अंजनेरी जवळील ब्रम्हा व्हॅली कॉलेजच्या मागे जे 2 सुळके आहेत त्यांना नवरा नवरी म्हणतात. या फोटोत डाव्या बाजूला ब्रम्हगिरीचा कडा नंतर विनायक खिंड व नवरा नवरी चा डोंगर आहे. नवरा नवरी हे जोड सुळक्याच्या डोंगरांना दिले जाणारे कॉमन नाव आहे

Comments are closed.

Exit mobile version