Home विस्मरणात गेलेली पुस्तके

विस्मरणात गेलेली पुस्तके

विज्ञानबोधाची प्रस्तावना – श्री.म.माटे (Vidnyanbodhachi Prastavana)

श्री.म.माटे उर्फ माटे मास्तर हे महाराष्ट्रातल्या कर्त्या सुधारकांपैकी एक. त्यांनी दलित साहित्याची पहाट होण्यापूर्वी ‘उपेक्षितांचे अंतरंग’ लिहून दलितांची स्थितीगती मराठी समाजासमोर आणली. त्यातले, ‘बन्सीधरा! तू कोठे जाशील?’ ‘कृष्णाकाठचा रामवंशी’ किंवा ‘सावित्री मुक्यानेच मेली’ ह्या कथा आजही अनेकांच्या लक्षात असतील. ‘विज्ञानबोधाची प्रस्तावना’ हे कुठल्या पुस्तकाची प्रस्तावना नसून स्वतंत्र पुस्तक आहे. त्यांचा ‘विज्ञानबोध’ नावाचे वार्षिक नियमितपणे प्रकाशित करण्याचा मानस होता. याची पूर्वपीठिका म्हणून त्यांनी हे पुस्तक लिहिले. त्यात त्यांनी विज्ञाननिष्ठ विवेकवादी दृष्टीकोनाची मांडणी केली आहे. गिरीश दुर्वे यांच्या लेखाच्या निमित्ताने या पुस्तकाविषयी जिज्ञासा जागृत व्हावी हाच हेतू आहे...

अर्थशास्त्राचे आद्य चार ग्रंथ (The first four books of Economics In Marathi)

मराठीतील अर्थशास्त्राविषयीचे पहिले चार ग्रंथ 1843 ते 1855 या दरम्यान, म्हणजे 1857 च्या स्वातंत्र्ययुद्धापूर्वी आणि कंपनी सरकारचा अंमल जाऊन ब्रिटिश पार्लमेंटचा भारतावर अंमल येण्याआधी लिहिली गेली आहेत. मुंबई विद्यापीठ 1857 साली स्थापन झाले. त्यापूर्वी मराठीतून ज्ञानाचा प्रसार करण्यासाठी निसर्गविज्ञानाची व मानवविज्ञानाची पुस्तके लिहिणारे लेखक त्यांच्या काळातील ज्ञान मराठीतून लोकांना देत होते ! या चार ग्रंथांमध्ये अर्थशास्त्राविषयी मांडलेले विचार, त्या काळात मराठी वाचकांना फार नवे होते...

एव्हीलीन कोब्बोल्ड – स्वेच्छेने केलेले इस्लाम धर्मांतर

0
धर्मांतर म्हटले, की हिंदुस्तानातील वाचकांच्या मनात प्रथम नापसंतीची लहर उमटते. त्याचे कारण म्हणजे धर्मांतर हे पोर्तुगीजांनी गोव्यात घडवलेले माहीत असते किंवा मुस्लिम धर्मात जबरदस्तीने झालेल्या धर्मांतराच्या गोष्टी माहीत असतात. मात्र ख्रिस्ती धर्मातून इस्लामचा स्वीकार करून मुस्लिम झालेले पुरुष आणि स्त्रियाही अनेक होत्या आणि ते सारेजण ब्रिटिशांची सत्ता सर्व जगात पसरलेली असताना, धर्मांतर करून मुस्लिम झाले होते ! तशाच एका धर्मांतरित महिलेची आणि तिच्या लेखनाची ही ओळख...

मार्सेलिसची मासीया – रशियन तरुणीचे भारतप्रेम (Massia Bibikoff’s book on an Indian in first...

0
मार्सेलिस हे फ्रान्सच्या किनाऱ्यावरील बंदर म्हणजे सावरकरभक्तांचे तीर्थस्थान आहे. सावरकर यांनी 1910 साली त्याच ठिकाणी समुद्रात उडी घेतली आणि ब्रिटिशांच्या ताब्यातून सुटण्याचा प्रयत्न केला. त्या मार्सेलिसमध्ये, सावरकर यांच्या उडीनंतर चारेक वर्षांनी रशियन रेखाटनकार आणि भारतीय संस्थानिक यांच्या मैत्रीची कथा आश्चर्यजनक अशी जन्मली व फुलली. ती कथा शब्दांत तर मांडली गेलीच, पण त्याहीपेक्षा ती चित्रांतून- रेखाचित्रांतून व्यक्त झाली. ते स्वाभाविकपणे घडून आले...

नोरा रिचर्ड्स पंजाबी रंगभूमीची आयरिश आजी (Nora Richards – The Irish Mother of Punjab’s...

1
कबीर बेदीची आई फ्रेडा बेदी. फ्रेडावर दोन पुस्तके आहेत. ती जेव्हा कांगडा जिल्ह्यातील आंद्रेत्ता येथे राहण्यास गेली तेव्हा तिला नोरा रिचर्ड्स नावाच्या आयरिश अभिनेत्रीने मोकळी जमीन दिली. फ्रेडाने तिचे घर तेथे उभे केले. साहजिकच, उत्सुकता निर्माण झाली की ही नोरा कोण? ती हिंदुस्तानात का आणि केव्हा आली होती? आणि ती अभिनेत्री होती तर तिने कांगडासारख्या दूर, निसर्गरम्य जिल्ह्यात राहण्याचे का ठरवले ?

टिळकांच्या गीतारहस्याचे रहस्य! (Why did Tilak write his world famous thesis Geetarahasya?)

1
लोकमान्य टिळक मंडालेच्या तुरुंगातून सुटून आले होते. त्यांना भेटण्यास येणाऱ्या-जाणाऱ्यांवर पोलिसांची बारीक नजर होती. तशा परिस्थितीत टिळक यांना भेटण्यास एक शास्त्री आले. त्यांनी दोघांना माहीत असलेल्या एका गृहस्थांची चौकशी लोकमान्यांकडे केली. टिळक लगेच उठले व स्वतः खाली जाऊन त्या गृहस्थांबाबत तपास करून आले. लोकमान्यांनी सांगितले ‘ते गृहस्थ तळेगावला गेले आहेत’ पुढे, टिळक यांनीच स्वत:हून ‘गीतारहस्या’ची गोष्ट काढली. ‘माझ्या गीतारहस्याबद्दल काशीकर पंडितांचे मत काय आहे?’

धर्मशास्त्राचा इतिहास (History Of Dharmashastra)

1
‘हिस्टरी ऑफ धर्मशास्त्र’ हा गेल्या शतकात भारतात निर्माण झालेला पंच खंडात्मक महान ग्रंथ आहे. तो महामहोपाध्याय पा.वा. काणे यांनी सिद्ध केला. त्या ग्रंथाचा आधार जगभरातील विद्वान भारतीय धर्म, नीती व तदनुषंगिक विषयांवरील अधिकृत प्रमाणग्रंथ म्हणून घेत असतात. भारतीय संसदेनेही धार्मिक, सामाजिक, नागरी कायदे बनवताना मार्गदर्शक म्हणून त्याचा आधार वेळोवेळी घेतला आहे...

रतनबाई – तरुण विवाहितेचे शब्दचित्र

हिंदुस्थानी महिलेने लिहिलेले आणि इंग्लंडमध्ये प्रकाशित झालेले पहिले पुस्तक मराठी लेखिकेचे होते. ते लंडनमध्ये 1895 साली प्रसिद्ध झाले. त्या पुस्तकाचे नाव Ratanbai - A Sketch of a Bombay High Caste Young Wife. त्या पुस्तकाच्या लेखक शेवंतीबाई निकंबे या होत्या. पुस्तकाच्या सतरा आवृत्त्या 1895 ते 2017 या काळात निघाल्या...

आपण इतिहास जपतो का? (Do Indians understand value of the history)

0
मला माझ्या प्रवासवर्णने वाचण्याच्या आवडीमुळे काही शोध लागले. जसे, की -मराठीतील पहिले प्रवासलेखन गोडसे गुरुजींचे ‘माझा प्रवास’ हे नाही; -राघोबादादा यांनी त्यांच्या हणमंतराव नावाच्या कारभाऱ्यांना इंग्रजांची मदत मिळते का ते पाहण्यासाठी इंग्लंडला 1761 मध्ये पाठवले होते. इतर देशांतील प्रवासी हिंदुस्थानात त्याआधी काही शतकांपासून येत होते. त्यांनी ते सिद्ध करणारी प्रवासवर्णने लिहून ठेवली आहेत...

विज्ञान दृष्टी, स्त्रीवाद आणि रोकिया खातून (Rokiya Khatoon’s 1905 story speaks about scientific temper...

0
एकशेसोळा वर्षांपूर्वी चौदा-पंधरा पानांची एक विज्ञानकथा लिहिली गेली हे समजले तर आश्चर्य वाटेल ना? - त्यावेळी ती काल्पनिक कथा मानली गेली असेल. आणखी आश्चर्य म्हणजे त्यातून स्त्रीवाद देखील प्रकट होतो ! त्या कथेचा अनेक विषयाच्या अभ्यासकांनी त्यांच्या लेखनांत त्यानंतर कित्येक दशके उल्लेख केला आहे...