राष्ट्रपतीपदाचे कलंदर उमेदवार कर्तारसिंग

1
240

काही वर्षांपूर्वी राष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर झाली, की वर्तमानपत्रांत कर्तारसिंग यांचे नाव गाजत असे. कारण राष्ट्रपतीपदाच्या पहिल्या निवडणुकीपासून पुढील अनेक निवडणुकांपर्यंत इच्छुक उमेदवारांत कर्तारसिंग थत्ते आघाडीवर असत. त्यांचे नाव कर्तारसिंग असे असले तरी ते होते महाराष्ट्रीयन… मराठी व्यक्ती… लक्ष्मण गणेश थत्ते !

काही वर्षांपूर्वी राष्ट्रपतीपदाची निवडणूक जाहीर झाली, की वर्तमानपत्रांत कर्तारसिंग यांचे नाव गाजत असे. कारण राष्ट्रपतीपदाच्या पहिल्या निवडणुकीपासून पुढील अनेक निवडणुकांपर्यंत इच्छुक उमेदवारांत कर्तारसिंग थत्ते आघाडीवर असत. त्यांचे नाव कर्तारसिंग असे असले तरी ते होते महाराष्ट्रीयन… मराठी व्यक्ती… लक्ष्मण गणेश थत्ते !

थत्ते हे भारताचे पहिले पंतप्रधान पंडित नेहरू यांचा दु:स्वास करत. राष्ट्रपतीपदासाठी पहिली निवडणूक 1952 साली जाहीर झाली, त्यावेळी काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ. राजेंद्रप्रसाद हे होते. त्यांच्या विरोधात इतर कोणत्याही राजकीय पक्षाने उमेदवार उभा केलेला नव्हता, परंतु चार अपक्ष उमेदवार मात्र उभे होते. त्यात लक्ष्मण गणेश थत्ते यांचा समावेश होता. त्या निवडणुकीत साहजिकच डॉ. राजेंद्रप्रसाद निवडून आले. त्यांना पाच लाखांहून अधिक मते मिळाली. मात्र चार अपक्ष उमेदवारांत लक्ष्मण थत्ते यांना दुसऱ्या क्रमांकाची म्हणजे दोन हजार सहाशेबहात्तर अशी मते मिळाली होती. पुढेही थत्ते यांनी अनेकदा ती निवडणूक लढवली, पण त्यांना यश लाभले नाही.

राष्ट्रपतीपदाच्या त्या निवडणुकीसाठी कोणीही व्यक्ती उमेदवारी जाहीर करत. त्यामुळे देशाच्या त्या सर्वोच्च पदाच्या निवडणुकीचा दर्जा राखण्यासाठी राष्ट्रपती निवडणुकीसंबंधीच्या कायद्यात दुरुस्ती करण्यात आली. त्यानुसार ज्या उमेदवारास राष्ट्रीय वा राज्य पातळीवरील किमान पन्नास लोकप्रतिनिधींचा पाठिंबा असेल त्यांनाच त्या पदाची निवडणूक लढवता येऊ शकते, असा कायदा करण्यात आला. परिणामी, लक्ष्मण गणेश थत्ते राष्ट्रपती निवडणुकीतून इच्छुक उमेदवार म्हणून कायमचे बाद झाले.

अशा या लक्ष्मणरावांचे हिंदुत्व जहाल होते. ते हिंदुत्वाच्या रक्षणासाठी आक्रमक होत. ते हिंदू महासभेचे सक्रिय सदस्य होते. त्यामुळे हिंदू धर्माच्या संदर्भात कोणी लिखाण केलेले त्यांना पसंत पडले नाही तर ते संतप्त होत. त्यांच्या त्या रागाचा तडाखा प्रसिद्ध लेखक विजय तेंडुलकर यांनाही बसला होता. त्यावेळी तेंडुलकर ‘लोकसत्ते’त उपसंपादक होते. थत्ते यांनी ‘लोकसत्ते’च्या कार्यालयात जाऊन तेंडुलकर यांना वेताच्या छडीने फटकारले होते. कोणताही प्रतिकार न करता तेंडुलकर यांनी तो छडीचा प्रहार झेलला होता !

असे हे लक्ष्मणराव ‘कर्तारसिंग’ कसे बनले हा किस्सा सांगण्यासारखा आहे. त्यांनी त्यांना शस्त्रे बाळगता यावीत म्हणून शीख धर्माचा स्वीकार केला आणि ते ‘लक्ष्मण थत्ते’चे ‘कर्तारसिंग थत्ते’ बनले. ते  कमरेला कृपण लावून फिरू लागले. पुढे, त्यांची शस्त्र बाळगण्याची हौस फिटली आणि ते पुन्हा लक्ष्मण गणेश थत्ते बनले !

– जॉन कोलासो  8329596837  john.colaco@gmail.com

(‘जनपरिवार’वरून उद्धृत)

—————————————————————————————————————————————–

About Post Author

1 COMMENT

  1. लेख आवडला.ज्ञानात सर पडली.मराठी माणसाला अभिमान वाटावा अशी माहिती मिळाली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here