दादा कोंडके आणि सेन्सॉरची कैची

1
301

दादा कोंडकेंच्या सिनेमांवर द्वयर्थी संवाद आणि गीते यांमुळे सेन्सॉरची कैची चालायची. त्यावर दादा अफलातून युक्तिवाद करून एकेक कट रद्द करून घेण्यासाठी तुफान आवेशाने लढायचे. दादांच्या युक्तिवादापुढे तत्कालीन सेन्सॉरवालेही नि:शब्द होत…

दादा कोंडके दर मे महिन्यात मुंबईतून काही निवडक पत्रकारांना सोबत घेऊन गोव्याला जायचे; त्यांच्यासोबत रोज काही काळ घालवायचे. गप्पांची रसाळ मैफल रंगायची. त्यांच्या आयुष्यातील शेवटच्या गोवावारीत त्यांचा सहवास लाभला होता. त्यांच्या तोंडून ऐकलेली ही माहिती.

दादांच्या सिनेमांवर द्वयर्थी संवाद आणि गीते यांमुळे सेन्सॉरची कैची चालायची आणि दादा एकेक कट रद्द करून घेण्यासाठी तुफान आवेशाने लढायचे. दादांचे अफलातून युक्तिवाद ऐकण्यासाठी तत्कालीन सेन्सॉरवाले कट सुचवत असावेत, अशीही शंका कधी कधी येते.

दादांच्या एका गाण्यात खंडाळ्याच्या घाटात वाटेत बोगदा लागतो, या अर्थाच्या ओळीत बोगदा याच शब्दावर आक्षेप आला. हा शब्द बदला, असे सांगितले गेले.

दादा म्हणाले, पण हे तर भूगोलाच्या पहिलीच्या पुस्तकातसुद्धा सामान्यज्ञान म्हणून छापलेले आहे. त्यात अश्लील काय आहे?

सेन्सॉर सदस्य म्हणाल्या, ‘तो बोगदा हा शब्द अश्लील आहे.’

दादा म्हणाले, ‘त्यात अश्लील काय आहे?’

त्या म्हणाल्या, ‘ते सांगता येणार नाही, पण शब्द बदला.’

दादा म्हणाले, ‘बदलतो, पण तुम्ही बोगदाला मराठी प्रतिशब्द सांगा.’

त्या बार्इंनी आणि इतर सदस्यांनी बराच वेळ डोके खाजवले, पण प्रतिशब्द काही सापडला नाही.

– मुकेश माचकर mamanji@gmail.com

————————————————————————————————————————-

About Post Author

1 COMMENT

  1. त्या काळात दादा हे दादा होते! ऊगाचच नाही त्यांच्या ओळीने नऊ सिनेमांनी “सिल्वर ज्युबिली” गाठली…..!

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here