चांदागडच्या बाघबा राजाची प्रेमकहाणी (Love Story of Chandagad)

शिरपूर हे गाव चंद्रपूरहून चाळीस किलोमीटर अंतरावर आहे. ते यवतमाळ जिल्ह्याच्या वणी तालुक्यात आहे. शिरपूर हे गाव प्राचीन आहे. त्या गावाची लोकसंख्या चार ते पाच हजार आहे. गावाच्या भोवताली चारगाव, वारगाव, शेलु, नवेगाव, वेडाबाई, मेंढोली, वारगाव, शेलु, नवेगाव, वेडाबाई, मेंढोली, वरझडी, गोपालपूर, मंदरकेसुर्ली इत्यादी गावे येता. शिरपूर केंद्रस्थानी असल्यामुळे गावात मंगळवारचा मोठा बाजार भरत असे. परंतु दळणवळणाची साधने उपलब्ध झाली. त्यामुळे बाजाराचे स्वरूप हळुहळू लहान होत गेलेआहे.
           
शिरपूर गावात पुरातन टेकडी असून भोवताली हिरवीगर्द वनराई आहे. टेकडीची उंची दीडशे फूट आहे. टेकडीवर गोंडकालीन भुयार होते. ते बंद करण्यात आले आहे. त्याला गावातील लोक गोटा दरवाजा’ असे म्हणतात. टेकडीवर पंचवीस तीस वर्षांपूर्वी महादेवाची मूर्ती भग्नावस्थेत सापडली होती. तिला कारागिरांनी योग्य रूप देऊन, गावकऱ्यांच्या मदतीने तिची विधिवत पूजा केली. नंतर मूर्तीची प्रतिष्ठापना करण्यात आली. त्या ठिकाणी महाशिवरात्रीला मोठी यात्रा भरते. तो रिसरमध्य प्रदेशातील पचमढी येथील मोठ्या महादेवासारखाच दिसत असल्यामुळे त्या रिसरातील रहिवासी त्याला गरिबांची पंचमढी असे म्हणतात. शिरपूर गावाच्या आजुबाजूला काही प्रसिद्ध मंदिरे आहेत. वरझडीचे हेमाडपंती अंबादेवीचे मंदिरजुगादचे महादेव मंदिर आणि चिखलीगोडगाव व वानोजा येथील देवीची मंदिरे; त्याखेरीज मंदर या गावातील सातवाहनशालिवाहन आणि वाकाटक यांच्या काळात खोदलेली लेणी ही मोठी आकर्षणे आहेत. शिरपूर या गावाला ऐतिहासिक वारसा आहे.  चांदागडला (चंद्रपूर) पाचशे वर्षांचा इतिहास आहे. गोंड राजांनी चांदागड हे राजधानीचे शहर केले. त्यामुळे त्यांच्या राज्याचा मोठा विस्तार झाला. चंदनखेडारामदेगीसुरजागडटीपागड पवणीचा किल्लायवतमाळ जिल्ह्यातील माहुरगडकायरशिरपूरकळंबचे क्षेत्र इत्यादी परिसर चांदागड राज्याच्या अधिपत्याखाली होता. कालांतराने, चांदागडचे एकाधिकार राज्य संपुष्टात आले आणि काही गोंड राजांनी स्वातंत्र्य घोषित केले. त्यात शिरपूरची गढीपण होती.
चंदनखेड्याचे गोंड राजे गोविंदशाह यांचे सोयरीक संबंध शिरपूरच्या राजघराण्याशी होते. शिरपूरचे राजे गोविंदशाह यांची मुलगी शिरपूरचे गोंडराजे कन्नाके यांना दिली होती (नाव ज्ञात नाही). शिरपूरच्या गढीला शिरपूरचा किल्ला म्हणताततो किल्ला वाकाटकसातवाहनकालीन आहे. त्या किल्ल्यावर गोंड राजांची सत्ता पाचशे वर्षें होती. किल्ल्याचे क्षेत्रफळ अंदाजे वीस हजार चौरस फूट आहे. किल्ल्याची तटबंदी मध्यम आकाराच्या दगडांनी बांधलेली आहे. बांधकामात विशिष्ट प्रकारची मातीरेती आणि विशिष्ट प्रकारचे पुरातन रसायन वापरले आहे. तटबंदी जवळपास दोन ते तीन फूट रूंद आहे. तटबंदीची उंची वीस फूट आहे. किल्ल्याला दरवाजा नाही. तो युद्धकाळात तोडला गेला असावा. गढीचे फक्त अवशेष शिल्लक आहेत.
किल्ल्यातील विहीर

त्या किल्ल्यात एक विहीर आहे. असूनती विहीर पंचवीस फूट खोल आहे. विहिरीच्या आत गायमुख असून पूर्वी बराच काळ त्यातून पाणी बाहेर पडत राहायचे. गावकरी त्या विहिरीच्या पाण्याचा वापर करत होते. आता,विहिरीच्या भोवती बरीच झाडे-झुडपे वाढल्याने विहिरीपर्यंत जाता येत नाही. विहिरीच्या आतील बाजूस भुयार असून ते बंद करण्यात आले आहे. चांदागडचे राजे रामशाह आणि शिरपूरचे बाघबा राजे यांच्या नातेसंबंधातील एक प्रेमकथा रोमहर्षक आहे. रामशाह यांचा बलवान राजा म्हणून नावलौकिक होता. ज्यावेळी शिरपूरची गढी त्यावेळी चांदागडला भुमापती रामशाह यांचे राज्य होते. त्या काळात गोंडराजे त्यांनी चांदागड राज्याचा विस्तार अल्पावधीत केला होता. शिरपूरच्या राजघराण्याशी त्यांचे नात्याचे आणि सलोख्याचे संबंध होते. शिरपूर या किल्ल्यातील तीनही राजपुत्र – बाघबाराघबा आणि आघबा – राज्यकारभार पाहायचे. बाघबा हे थोरले बंधू होते. त्या परिसरामध्ये त्यांच्या शौर्याचा दरारा होता. त्यांची राज्यकारभारावर चांगली पकड होती. राजे रामशाह हे त्या तीन राजपुत्रांचे मामा होते. एकदा, तिन्ही राजपुत्र चांदागडला गेले आणि मामाकडे काही दिवस मुक्कामी थांबले. मामानेही भाच्यांचा पाहुणचार केला. एके दिवशी मामा-भाच्यांमध्ये गोष्टी रंगल्या असतानाच राजे रामशाह यांची रुपवती सुंदर राजकन्या तेथून जात होती. बाघबा राजा आणि तिची नजरानजर झाली. बाघबा राजाची शरीरयष्टी देखणी होती. ते उंच आणि धिप्पाड देहाचे होते. बाघबा राजा तिच्या मनात भरले. ती त्यांच्याकडे आकर्षित झाली. तिला त्याची भेट एकांतात कधी होईल असे झाले आणि त्याच रात्री तिने बाघबा राजाच्या शयनकक्षात प्रवेश केला. प्रेमवार्तालाप झाला. एकमेकांसोबत लग्न करण्याची वचने दिली गेली. दोघांत प्रेमांकुर फुटले. त्याच रात्री राजवाड्यातील सैन्यात कुजबुज सुरू झाली. ती गोष्ट मामाला कळण्याआधी पहाटेच न सांगता चांदागडवरून तीनही राजपुत्र शिरपूरला परतले. परंतु बाघबा राजा त्याच्या पैजारा म्हणजेच चपला राजकन्येच्या शयनकक्षाबाहेर विसरला. राजे रामशाह आणि राणी यांना त्या गोष्टीची कुजबुज लागली. त्यांनी शहानिशा केली असतात्यांना काळेबेरे असल्याचे जाणवले. राजाचा संताप अनावर झाला. राजे रामशाहने त्यांच्या सैन्यासह राजपुत्रांचा पाठलाग केला. परंतु तिन्ही राजपुत्र शिरपूर किल्ल्यात पोचले होते. राजे रामशाह यांनी वर्धा नदीच्या काठावर तरोडा या गावी तळ ठोकला आणि युद्धासाठी बाघबा राजाला संदेश पाठवला. तिन्ही भाऊ लढाईकरता सज्ज झाले. पस्तीस ते चाळीस हजारांची फौज घेऊन बाघबाराघबा आणि आघबा घुग्घसकडे रवाना झाले. नगारे रणमैदानी वाजू लागलेरणशिंग फुंकले गेले. तोफांचा मारा दोन्ही बाजूंनी सुरू झाला. सैन्याला सैन्य भिडले. एकच कापाकापी सुरू झाली. सैन्यघोडेहत्ती धारातीर्थी पडू लागले. रक्ताचे पाट वाहू लागले. तशातच राघबा राजाने मामा राजे रामशाह यांच्यावर तलवारीने हल्ला चढवला. दोघांमध्ये घनघोर युद्ध झाले. राघबा हे राजे रामशाहला भारी पडले. राजे रामशाह यांनी तात्पुरती माघार घेतली. हजारो धडे धरतीवर पडून तडफडत होती. जिकडे तिकडे एकच आक्रोश ऐकू येत होता. परंतु तेवढ्यात तोफेचा गोळा राघबाच्या छातीत लागला आणि राघबा धरतीवर कोसळून गतप्राण झाला. त्यामुळे बाघबा आणि आघबा यांचा धीर सुटला. परंतु दोघांनी युद्ध सुरूच ठेवले. तेव्हाच बंदुकीची गोळी आघबाच्या छातीत घुसली आणि आघबाही धारातीर्थी पडला. त्यामुळे बाघबाची हिंमत खचली. त्याने शिरपूर किल्ल्याकडे सैन्यासह पळ काढला. राजे रामशाहच्या सैन्याने बाघबाचा पाठलाग केला. बाघबा राजा किल्ल्यातील भुयारात लपून बसला. त्याच्या रक्षकांनी भुयाराच्या तोंडावर दगडी चिरे लावून भुयाराचे तोंड बंद केले. शंका येऊ नये म्हणून पुरातन दगडाची मूर्ती ज्यांचे नाव तोंड्यासुर होतेभुयाराच्या तोंडावर बसवून त्याचे गोटेसुद्धा झाकण्यात आले. तेवढे करूनसुद्धा बाघबा राजा भुयारात लपून बसला असल्याचा सुगावा लागला.

बाघबा राजाचे समाधी स्थळ

त्यांनी भुयाराचे दगड काढून त्या ठिकाणी कडबा, कुटार व जळाऊ लाकडे भरली आणि भुयाराला आग लाऊन दिली. त्यामुळे राजपुत्र बाघबा आतमध्येच गुदमरून मृत्यू पावला. अशा प्रकारे एक राजपुत्र आणि राजकन्या यांच्या प्रेमाचा अंत प्रलयंकारी विद्ध्वंसाने झाला. त्याचबरोबर शिरपूरचे राजवैभव संपुष्टात आले. बाघबा राजाची समाधी महादेवाच्या टेकडीखाली गावालगत बांधली गेली आहे. त्या ठिकाणी एक मंदिरही उभे राहिले आहे.

धर्मेंद्र जी कन्नाके 9405713279
kannakedharmendra1971@gmail.com

धर्मेंद्र कन्नाके यांनी एमबीएचे शिक्षण घेतले आहे. ते चंद्रपूर येथे राहतात. त्यांना महाराष्ट्र शासनाचा 2015-16 सालचा गुणवंत कामगार पुरस्कार मिळाला आहे. 

————————————————————————————————————–

 

 

 

 

—————————————————————————————————

About Post Author

1 COMMENT

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here