अभिनेत्री म्हणजे नटी, अॅक्ट्रेस. अभिनेत्री हे अभिनेता या पुल्लिंगी शब्दाचे स्त्रीलिंगी रूप आहे. म्हणजे अभिनेता हा (पुरुष) नट, तर अभिनेत्री ही (स्त्री) नटी. ‘नेतृ’ असा संस्कृत शब्द आहे. त्याचे पुल्लिंगी रूप होते नेता आणि स्त्रीलिंगी रूप होते नेत्री. नेत्री हे रूप अभिनेत्री शब्दात सहजपणे वापरले जाते; पण नेत्री हा शब्द राजकारणात वा समाजकारणात नेतृत्व करणाऱ्या स्त्रियांसाठी मात्र प्रचारात येऊ शकलेला नाही. पुढारीण, नेती असे शब्द वापरण्याऐवजी ‘नेत्री’ म्हणण्यास काय हरकत आहे?
– म.बा.कुलकर्णी gjcrtn@gmail.com
(‘शब्दचर्चा’ वरून उद्धृत संपादित -संस्करीत)