राज्याच्या सोळा जिल्ह्यांत बावन्न तालुके ऊसतोड व्यवसायात आहेत. ऊसशेती गेल्या सत्तर वर्षांत महाराष्ट्रात बहरली, त्यासोबत साखर कारखाने निघाले. शेतांतील ऊस तोडून त्या कारखान्यांना पुरवणारा ऊसतोड कामगार म्हणजे स्थलांतरित मजुरांचा एक मोठा समुदाय. मात्र तो समुदाय म्हणजे असे मजूर की जे जी जागा मिळेल, जसे खाणेपिणे असेल, जशी परिस्थिती असेल तशा परिस्थितीत राहतात. त्यांचा स्वत:चा पसारा असा काहीच नसतो, पण जो आहे त्यावर त्यांना ऊसतोडणीच्या हंगामाचे पाच-सहा महिने काढायचे असतात. त्यांच्या अडचणी मात्र सुटताना दिसत नाहीत...
आई-मुलीचे शब्दांची गरज न भासता, एकमेकींना समजण्याचे अनुभव तसे वैश्विकच. वत्सलाबाई बापुराव भोंग यांनी आईबद्दलच्या आठवणी गप्पांतून सांगितल्या आहेत. सोप्या शब्दांतून, प्रामाणिक संवादातून त्यांच्या नात्यांमधले उमाळे, कढ, आपुलकी आणि स्नेह व्यक्त होतोय. नात्यातला ओलावा टिकवून धरणाऱ्या गोष्टींची अनुकरणीय जाणीव हा लेख वाचणाऱ्या सगळ्यांना झाल्यावाचून राहणार नाही...
अशोक ढवण हे सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातून विद्यापीठाचे कुलुगुरू झाले. त्यामुळे त्यांनी शैक्षणिक व शेती क्षेत्रांत संशोधनापासून उपयोजनापर्यंतची अनेकविध कामगिरी करत असताना माणसामाणसातील जिव्हाळा जपला, साहित्याचे प्रेम राखले आणि सभोवतालच्या समाजजीवनाचा एकूण स्तर उंचावला...
कडधान्य पिकांचे मानवी आहारात महत्त्वाचे स्थान आहे. कडधान्य हा प्रथिने पुरवणारा मुख्य व स्वस्त स्रोत आहे. कडधान्यांमध्ये प्रथिनांचे प्रमाण वीस ते पंचवीस टक्के आहे. शरीराची होणारी झिज भरून काढण्यासाठी प्रथिनांची नितांत आवश्यकता असते. कडधान्य पिकांमध्ये खनिजे व जीवनसत्त्वे पुरेशा प्रमाणात असल्याने समतोल आणि पौष्टिक आहार म्हणून उपयोग होतो...
पुरुषोत्तम भापकर यांची ख्याती प्रशासनात कर्तव्यकठोर व सर्वसामान्यांच्या कामांसाठी तत्पर अधिकारी अशी आहे. ते विशेषत: तळागाळातील लोकांबद्दल अधिक दक्ष असतात. ते पदाचा बडेजाव मिरवत नाहीत, कामे मार्गी लावतात, स्वाभाविकच आहे ते, कारण ते हळव्या मनाचे संवेदनशील व प्रतिभावंत कवीदेखील आहेत. ती त्यांची ओळख निवडकांनाच माहीत आहे. त्यांचा बाणा शासकीय योजना या सर्वसामान्य जनतेच्या हितासाठी राबवाव्या हा आहे...
साधारणपणे स्मशानभूमी म्हटले की सर्वांच्या डोळ्यांसमोर येते ते चित्र म्हणजे मृतदेहावर अंत्यसंस्कार करण्यासाठी उभारलेले पत्र्याचे शेड आणि त्याच्या आजूबाजूला वाढलेली झाडेझुडपे ! पण मृतदेहावर अंत्यसंस्कार स्वच्छ, सुंदर परिसरात करणारी एक वेगळी स्मशानभूमी परभणी जिल्ह्यातील झरी या गावी आहे. झरीतील त्या स्मशानभूमीला आयएसओ (ISO) मानांकन प्राप्त झाले आहे...
‘दण्डार’ हा नृत्यप्रकार प्राचीन काळापासून चालत आलेला आंध जमातीचा नृत्यप्रकार आहे. निसर्गातील मानवाला जीवन देणाऱ्या महाभूतांविषयीची श्रद्धा हा दंडारणातील विविध कलाविष्कारांचा विषय असतो. आंधांची जीवनपद्धतच त्यांच्या नृत्यातून व्यक्त होते म्हणून त्याला लोकधर्मी संबोधले जाते...
केरवाडी-परभणी येथील सूर्यकांत कुळकर्णी हा सतत अस्वस्थ व म्हणून संतप्त असतो. तो एकूण सामाजिक निष्काळजीपणाबद्दल हतबलता व्यक्त करत राहतो - मात्र तेवढ्यापुरता. तो त्याच्या सत्तराव्या वर्षीदेखील ‘अँग्री यंग मॅन’ वाटतो...
लोकमत या वृत्तपत्राने एक बातमी 16 सप्टेंबर रोजी दिली. बातमीत असे म्हटले आहे, की राज्यामध्ये एकशेएक शाळांना मान्यताच नसताना तेथे शासनाच्या योजना राबवल्याचे दाखवून लाखो रुपयांचे अनुदान देण्यात आले! केंद्र शासनाने हे महाराष्ट्र शासनाच्या निदर्शनास आणून दिले आहे.
कोरोना व्हायरसमुळे लोकांची घरवापसी/स्थलांतर मोठ्या प्रमाणावार होत आहे. तो फार मोठा प्रश्न होणार आहे. मी त्या प्रश्नाकडे एक संधी म्हणून पाहत आहे. त्यामुळे स्थलांतरित होणाऱ्यांच्या आयुष्याला कलाटणी मिळण्याची शक्यता आहे. वास्तवात इट्स रिस्टोरेशन इन रिअॅलिटी. मला मराठवाड्याच्या परभणी, उस्मानाबाद, लातूर आणि बीड जिल्ह्यांची माहिती आहे.