मुंबई उपनगर जिल्यातील तालुक्यांची यादी

सोबतच्या यादीतील तालुक्यावर क्लिक करून त्या तालुक्यातील लेख वाचता येतील.

  • कुर्ला
  • बोरीवली
  • अंधेरी

मुंबई उपनगर जिल्यातील लेख

निढळाच्या घामाची नगरी – धारावी (A City of Hard Working People)

आशियातील सगळ्यात मोठी झोपडपट्टी हे बिरुद (!) मिरवणारी धारावी ही झोपडपट्टी. सुरुवातीला ती मुंबई शहराच्या शीवेच्या म्हणजे सायनच्या बाहेर होती. पाण्याने एखाद्या बेटाला विळखा घालून पुढे जावे, तसे मुंबई शहर धारावीला विळखा घालून पुढे सरकत गेले. धारावी आता वाढत्या शहराच्या मध्यावर आली आहे. तो कष्टकऱ्यांचा मिनीभारतच आहे ! भारतभरच्या सगळ्या प्रांतांमधील विविध भाषा बोलणारे, वेगवेगळ्या धर्मांचे, पंथांचे लोक तेथे वस्ती करून आहेत. घेट्टो करून रहाणं ही माणसांची स्वाभाविक प्रवृत्ती आहे. त्यामुळे एकच व्यवसाय करणाऱ्या लोकांच्या प्रांतनिहाय वस्त्या धारावीत आहेत. धारावीने मुंबईच्या मध्यभागी जवळपास सहाशे एकर जमीन व्यापली आहे. सध्याच्या काळात जमिनीला आलेले मोल कोणाला सांगायला नको...

एकसरचे वीरगळ (Hero Stones of Eksar)

दहिसर बोरिवलीच्या दरम्यान एकसर नावाचे खेडे होते. आजही त्याला एकसर व्हिलेज अशे म्हणतातपण त्यात खेडे असण्याच्या  कुठल्याही खूणा दिसत नाहीत. अशा या ठिकाणी सहा...

ज्ञानव्रती गीता गोरेगावकर-गोडबोले (Geeta Goregaonkar-Godbole – The Researcher)

गीता गोरेगावकर-गोडबोले या ज्ञानव्रती आहेत. त्यांचा ध्यास वैद्यकीय क्षेत्रातील अभ्यास व संशोधन हा आहे. गीता यांनी नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर रिसर्च इन रिप्रॉडक्टिव्ह हेल्थमधून डॉ. दीपक मोदी यांच्या मार्गदर्शनाखाली Ph.D. केली.

दादासाहेब तोरणे : आद्य चित्रपटकर्ते (Dadasaheb Torne)

0
भारतीय चित्रपटाचे जनक कोण? दादासाहेब फाळके, की दादासाहेब तोरणे असा छोटासा वाद महाराष्ट्रात एकेकाळी होऊन गेला. तो मान मात्र दादासाहेब फाळके यांना दिला गेला. भारताचा पहिला चित्रपट दादासाहेब फाळके यांचा 1913 मधील ‘राजा हरिश्चंद्र’ हा मानला जातो.