ब्रिटिश भारतातून 15 ऑगस्ट 1947 रोजी परतल्यानंतर, निजामाने स्वतंत्र हैदराबाद राज्याची घोषणा केली. धर्मांध कासीम रिझवी यांच्या रझाकार संघटनेने हैदराबाद राज्यातील हिंदू आणि धर्मनिरपेक्ष मुसलमान यांच्यावर अमानुष अत्याचाराचे सत्र सुरू केले. उलट, संस्थानातील जनतेने भारतात विलीन होण्यासाठी लढा उभारला. लोक त्या लढ्यात स्वामी रामानंद तीर्थ यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या संख्येने सहभागी झाले. स्वातंत्र्यवीरांनी रझाकारांच्या अत्याचारांचा प्रतिकार केला आणि त्यात त्यांच्या प्राणाची आहुती दिली...
संयुक्त राष्ट्र संघातर्फे आंतरराष्ट्रीय भरडधान्य वर्ष म्हणून 2023 हे साल पाळले जात आहे. संयुक्त राष्ट्र संघाने हा निर्णय भारत सरकारच्या सांगण्यावरून घेतला आहे. भारत सरकारने त्या पूर्वी, 2018 हे साल भरडधान्य वर्ष म्हणून पाळले होते. ज्वारी, बाजरी, नाचणी यांसारख्या डाळीच्या प्रकारातील धान्यांचा समावेश भरडधान्यात होतो...
नांदखेडा हे गाव बदनापूर तालुक्याच्या शेवटच्या टोकाला आहे. तेथील देवदरी हे बदनापूर, फुलंब्री व औरंगाबाद या तीन तालुक्यांच्या सीमेवर असलेले चौदाव्या शतकातील महादेव मंदिर आहे. ते निसर्गाच्या कुशीत व डोंगरांच्या रांगेत वसलेले आहे. मात्र मंदिर दुर्लक्षित आहे, कारण ते पुरातत्त्व विभागाच्या ताब्यात आहे. त्यामुळे त्याचा विकास झालेला नाही...
देवेश पाथ्रीकर हे आहेत बदनापूर येथे मानसशास्त्राचे प्राध्यापक, पण त्यांनी वसा घेतला आहे तालुका मोतिबिंदू मुक्त करण्याचा. ते तालुक्यातील गावोगावी नेत्र तपासणी शिबिरांचे आयोजन करून राहिले आहेत. डोळ्यांचा रोगी सापडला, की ते त्याला जरुरीप्रमाणे ‘औषधी-ड्रॉप्स’चे विनामूल्य वाटप करतात अथवा ऑपरेशनसाठी हॉस्पिटलात नेतात. त्यांचा प्रत्येक आठवड्याचा कार्यक्रम लागलेला असतो. त्यात मोतिबिंदूचे निदान असलेल्या रूग्णांवर थेट मोफत शस्त्रक्रिया करून त्यांना घरपोच सोडले जाते...
राज्याच्या सोळा जिल्ह्यांत बावन्न तालुके ऊसतोड व्यवसायात आहेत. ऊसशेती गेल्या सत्तर वर्षांत महाराष्ट्रात बहरली, त्यासोबत साखर कारखाने निघाले. शेतांतील ऊस तोडून त्या कारखान्यांना पुरवणारा ऊसतोड कामगार म्हणजे स्थलांतरित मजुरांचा एक मोठा समुदाय. मात्र तो समुदाय म्हणजे असे मजूर की जे जी जागा मिळेल, जसे खाणेपिणे असेल, जशी परिस्थिती असेल तशा परिस्थितीत राहतात. त्यांचा स्वत:चा पसारा असा काहीच नसतो, पण जो आहे त्यावर त्यांना ऊसतोडणीच्या हंगामाचे पाच-सहा महिने काढायचे असतात. त्यांच्या अडचणी मात्र सुटताना दिसत नाहीत...
किन्होळा हे हे गाव डोंगराच्या पायथ्याशी वसलेले आहे. या गावामध्ये जवळजवळ पस्तीस व्यक्ती शिक्षक या पदावर असून ‘शिक्षकांचे गाव’ अशी या गावाची ख्याती पंचक्रोशीत आहे. मात्र असे शैक्षणिक वातावरण गावात कशामुळे निर्माण झाले हे सांगता येत नाही. पण यांतील बरीच घरे दोन पिढ्या तरी शिक्षकी पेशात आहेत. गावाला सांस्कृतिक परंपरा लाभली आहे...
चाळीस वर्षांचे जालन्याचे शिक्षक नारायण कौतिकराव भुजंग हे विवेकानंदांचे वाङ्मय वाचून प्रेरित झाले आणि त्यांनी त्यांच्या किन्होळा या गावी स्वामी विवेकानंद आश्रम काढला. त्यासाठी स्वत:ची तीन एकर जमीन दिली आणि केंद्र चालवण्यासाठी ते दरवर्षी पस्तीस-चाळीस हजार रुपये खर्च करतात. किन्होळा हे गाव बदनापूर तालुक्यात आहे...
अशोक ढवण हे सर्वसामान्य शेतकऱ्याच्या कुटुंबातून विद्यापीठाचे कुलुगुरू झाले. त्यामुळे त्यांनी शैक्षणिक व शेती क्षेत्रांत संशोधनापासून उपयोजनापर्यंतची अनेकविध कामगिरी करत असताना माणसामाणसातील जिव्हाळा जपला, साहित्याचे प्रेम राखले आणि सभोवतालच्या समाजजीवनाचा एकूण स्तर उंचावला...
दावलवाडी हे गाव जालना जिल्ह्याच्या बदनापूर या तालुक्यात आहे. ते जालन्यापासून आठ किलोमीटर तर बदनापूर या तालुक्याच्या केंद्रापासून दहा किलोमीटर अंतरावर वसले आहे. या गावाने आर.आर. पाटील ग्रामविकास मंत्री असताना, ‘संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियाना’त जिल्ह्यात 2002 मध्ये दुसरा क्रमांक तर पुढच्याच वर्षी 2003 मध्ये पहिला क्रमांक मिळवला होता. गावाला राष्ट्रपती पुरस्कार 2000 ते 2005 या काळातील उल्लेखनीय कामाबद्दल मिळालेला आहे...
बदनापूर संशोधन केंद्र हे अखिल भारतीय कडधान्य सुधार प्रकल्पातील एक प्रमुख केंद्र आहे. हे केंद्र जालना जिल्ह्यात येते. त्याचा कारभार मराठवाडा कृषी विद्यापीठांतर्गत चालतो. तेथे महाराष्ट्रातील महत्त्वाची कडधान्ये, विशेषत: तूर, मूग, उडीद आणि हरभरा या पिकांवर संशोधन केले जाते...