Home Authors Posts by राजेंद्र साळवे

राजेंद्र साळवे

1 POSTS 0 COMMENTS
राजेंद्र दादाराव साळवे हे किन्होळा या गावापासून पाच किलोमीटरवरील विल्हाडी या गावातील हिम्मतदादा माध्यमिक विद्यालयामध्ये शिक्षक आहेत. त्यांचे बी ए, बी एड असे शिक्षण झाले आहे. ते मराठी व समाजशास्त्र विषय शिकवतात. ते स्वामी विवेकानंद आश्रमाच्या स्थापनेपासून जोडलेले आहेत. त्यांचा आश्रमात विविध स्पर्धा, कार्यक्रम आयोजित करण्यात पुढाकार असतो.

किन्होळा गावचा स्वामी विवेकानंद आश्रम

चाळीस वर्षांचे जालन्याचे शिक्षक नारायण कौतिकराव भुजंग हे विवेकानंदांचे वाङ्मय वाचून प्रेरित झाले आणि त्यांनी त्यांच्या किन्होळा या गावी स्वामी विवेकानंद आश्रम काढला. त्यासाठी स्वत:ची तीन एकर जमीन दिली आणि केंद्र चालवण्यासाठी ते दरवर्षी पस्तीस-चाळीस हजार रुपये खर्च करतात. किन्होळा हे गाव बदनापूर तालुक्यात आहे...