शंकर बळवंत पळशीकर हे चित्रकार तर होतेच; त्याबरोबर ते उत्तम शिक्षक आणि प्रतिभावान कलासमीक्षकही होते. त्यांनी उत्तमोत्तम चित्रे निर्माण केली आणि कलेद्वारे कलाप्रेमींसमोर आत्मपरीक्षणात्मक विचार मांडले. त्यांच्या कलासाधनेतून आणि विचारांतून अंतर्मुख, चिंतनशील असा कलाविचार रसिकांसमोर येतो. पळशीकर यांची चित्रे ही दृश्य सौंदर्याच्या पलीकडे जातात. त्यांच्या चित्रांतून वैचारिक संवाद निर्माण होतो. त्यामध्ये पारंपरिक भारतीय रंगछटा, मध्यकालीन भित्तिचित्रांचे प्रभाव आणि आधुनिक कला यांचा संगम दिसतो. त्यांनी अमूर्त चित्रकला स्वीकारली, पण ती केवळ तांत्रिक नव्हती- त्यात जीवन, मन आणि अस्तित्व यांचा खोल शोध होता. त्यांची चित्रे गूढ शांतता प्रस्थापित करतात आणि कलाप्रेमींना विचार करण्यास लावतात...
पद्मा अनंत पिंपळीकर अचलपूरात राहत नाहीत. त्यांनी ते गाव सोडले व त्या लेकाकडे- श्रीरामकडे राहण्यास गेल्या. परंतु त्यांची छाप- त्यांच्या आठवणी अचलपूरच्या विशेषत: पांढरपेशा स्त्रीजीवनावर आहेत. मुख्यत: सुबोध हायस्कूलच्या शिक्षिका म्हणून त्यांच्या विविध आठवणी अचलपूरला आहेत. त्यांनी किती वेगवेगळ्या स्वरूपाची कामे गावात करून ठेवली आहेत !
बहिरमची यात्रा म्हणजे दोन राज्यांतील हिंदी व मराठी भाषिक लोकांमधील सांस्कृतिक संगम आहे ! यात्रा मध्य प्रदेश व महाराष्ट्र यांच्या सीमेवर भरते. सलग दीड महिन्यापेक्षा जास्त काळ चालणारी यात्रा म्हणून बहिरमच्या यात्रेचा लौकिक सर्वदूर आहे. यात्रेला पौराणिक महात्म्य आहे. बहिरम (भैरवनाथ) हे बऱ्याच कुटुंबांचे कुलदैवत आहे. यात्रेत देवदर्शनासोबत अध्यात्म, चित्रपट, मनोरंजन, महाप्रसाद, खाद्य संस्कृती, महिला मेळावा, कीर्तन, प्रदर्शन, पशुविक्री, कृषी साहित्य अशी सर्व गोष्टींची रेलचेल राहते...
इंग्रजांनी ब्राह्मण वर्ग कर्मकांडामध्ये रुळलेला, तात्त्विक विवेचन करणारा व केवळ बौद्धिक गोष्टी करणारा असतो, असा गैरसमज पसरवला. पण वास्तवात स्वतः अग्रेसरत्व करणारा असा माणूस ब्राह्मण म्हणून ओळखला जातो. तो सर्व क्षेत्रांमध्ये आहे. प्रत्यक्ष त्या त्या जीवनाच्या अंगाचे धुरीणत्व करणे, त्या क्षेत्राला दिशा देणे, प्रत्यक्ष ते आचरून इतरांना मार्गदर्शन करणे ही ब्राह्मण वर्गाची वैशिष्ट्ये होती...
अचलपूरच्या नाट्यकलेला दीडशे वर्षांचा ऐतिहासिक वारसा आहे. अचलपूरच्या बावनएक्का आणि बावीशी या दोन नाट्यगृहांतून नाट्यचळवळीतील विविध आयामांना बळ देण्याचे काम होत असे. मात्र, आता दोन्ही ठिकाणी वैभवाच्या शिखरावर असलेल्या नाट्यपरंपरा खंडित झाल्या आहेत…
नाशिकमधील गोदाकाठच्या श्री बालाजी मंदिराच्या नवरात्रोत्सवात एका ब्रिटिश अधिकाऱ्याने 1839 मध्ये अडथळा आणल्याने शहरात गोंधळ निर्माण झाला होता. ब्रिटिशांना तो गोंधळ थोपवण्यासाठी लष्कर बोलावावे लागले...
नाटक, दशावतार, भारूड, कीर्तन असे कोणतेही नवनवे कलाप्रकार एकाएकी जन्माला आलेले नाहीत. त्यांना पूर्व परंपरा आहे. ते घटक आणि काळाबरोबर विकसित होत असलेल्या नवनवीन कल्पना यांच्या एकत्रीकरणातून नवे ताजे काही जन्माला येते...
झाडीपट्टी रंगभूमीला एकशेबत्तीस वर्षें पूर्ण झाली आहेत. पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा या चार जिल्ह्यांची ‘झाडीपट्टी’ म्हणून ओळख आहे. त्या प्रदेशांत हिरव्याकंच झाडीने, जंगलांनी व्याप्त निसर्गाची लयलूट आहे.
झाडीपट्टी हा विदर्भाच्या भंडारा जिल्ह्यातील भाग तलावांचा प्रदेश म्हणून ओळखला जातो. काही तलाव केवळ कागदोपत्री आहेत, तर काही अत्यंत वाईट अवस्थेत. तलावांचे पाणी, मासे...
भंडारा जिल्ह्यात एक छोटे गाव आहे. खराशी. लोकसंख्या एक हजार. गाव दुर्लक्षितच. त्या गावातील जिल्हा परिषद शाळेत प्रथम सकाळी प्रार्थना आणि परिपाठ. त्यानंतरच्या तासात...