Home सांस्कृतिक नोंदी कुबेर – देवांचा खजिनदार (Treasury Man from God’s World)

कुबेर – देवांचा खजिनदार (Treasury Man from God’s World)

हिंदू पुराणांप्रमाणे, कुबेर हा देवांचा खजिनदार आणि उत्तर दिशेचा दिक्पाल समजला जातो. कुबेराचे खरे नाव सोम आहे. त्याला धनाची देवता म्हणून धनेश असेही म्हटले जाते. तो स्वामी सगळ्या यक्षांचा आहे. त्याला भगवान शिवाचा द्वारपाल असेही म्हटले जाते. तो विश्रवस् ऋषींचा पुत्र आणि लंकाधिपती रावणाचा सावत्र भाऊ होता. कुबेर हाही एक यक्षच होता, पण तो इतर यक्षांप्रमाणे देखणा नव्हता. तो कुरूप आणि बेढब होता. ‘बेर’/‘वेर’ म्हणजे शरीर. ज्याचे बेर कुत्सित आहे तो कुबेर ! त्याला तीन पाय आणि केवळ आठ दात आहेत. एका डोळ्याच्या ठिकाणी फक्त एक पिवळा ठिपका आहे असे वर्णन आपटे यांच्या शब्दकोशात आहे. चित्रावशास्त्री यांचा ‘प्राचीन चरित्रकोश’ सांगतो, की त्याचा डावा डोळा गेला आणि उजवा डोळा पिंगट झाला. कारण त्याने पार्वतीकडे डोळे किलकिले करून पाहिले !

(मेघदूत (पूर्वमेघ) …’ या पुस्तकातील परिशिष्टातून)
———————————————————————————————-

About Post Author

NO COMMENTS

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Exit mobile version