2 POSTS
सुवर्णा यांनी चिनी भाषेत जेएनयूमधून मास्टर्स केले आहे. त्या दिल्लीच्या ‘हिंदू’ वृत्तपत्रात पत्रकार होत्या. त्यांनी भाषांतरे आणि चिनी भाषा शिकवण्याची कामे केली. त्या लग्न होऊन दिल्लीतच 1994 साली स्थायिक झाल्या. त्यांचे पती व त्या, दोघांनी मिळून स्वतःचा पर्यटन व्यवसाय 1999 मध्ये सुरू केला. दोघे चिनी भाषेचे पदवीधर असल्याने चीन, थायवान, सिंगापूर अशा चिनी भाषिक देशांतील लोकांना भारताच्या सहली घडवल्या. त्यांचा व्यवसाय कोविडचा तडाखा बसेस्तोवर उत्तम सुरू होता. त्या चीनविषयी अभ्यास करतात व लिहितात.