Tag: Vidarbha
बहिरम – व्यापाऱ्यांची जत्रा (Bahiram Festival – Different Perspective)
बहिरम यात्रेला विदर्भात मोठे ऐतिहासिक स्थान आहे. ते बैतुल-होशंगाबाद या जुन्या राजमार्गावर येते. तेथील यात्रेचा उल्लेख वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या संदर्भात वेगवेगळ्या प्रकारे येतो. कॅप्टन मेडोज टेलरच्या ‘कन्फेशन ऑफ ए ठग’ या पुस्तकामध्ये त्याचे काही संदर्भ सापडतात. बहिरमचे दगडी मंदिर, त्याशी जोडलेली मच्छिंद्रनाथ, गोरखनाथ यांची नावे हे सारे भारतीय संस्कृतीचा वेगळ्याच दृष्टीने विचार आणि तत्संबंधी संशोधन करण्यास भाग पाडते...
गुणाकर मुळे- शिंदी ते दिल्ली
अचलपूर तालुक्यातील शिंदी बुद्रुक या गावी जन्मलेले आणि गावातच प्राथमिक शिक्षण पूर्ण केलेले गुणाकर मुळे यांनी विज्ञान लेखन साहित्यात उल्लेखनीय कार्य केले आहे. त्यांनी मराठी भाषिक असूनही दिल्लीत हिंदी आणि इंग्रजीतून लेखन केले आहे...
अचलपुरात जयपूरच्या राजा मानसिंग यांची समाधी
माणसाचे आयुष्य त्याला कोठे घेऊन जाईल, काहीच सांगता येत नाही. सम्राट अकबराच्या काळात मुघल साम्राज्याचा विस्तार करण्यात ज्या राजा मानसिंग यांचा सिंहाचा वाटा होता, त्या मानसिंग यांच्या आयुष्याची अखेर विदर्भातील अचलपूर या एका छोट्या शहरात झाली. मानसिंग अकबराच्या नवरत्नांपैकी एक मानले जात...
वऱ्हाडातील वास्तूंची बुरूजसाद
वऱ्हाड प्रांतातील पुरातत्त्वीय स्थानांचा परिचय विवेक चांदूरकर या युवा संशोधकाने ‘उद्ध्वस्त वास्तू - समृद्ध इतिहास’ या पुस्तकात करून दिला आहे. या पुस्तकातील प्रत्येक नोंद ही ऐतिहासिक दस्तावेज ठरावा इतके मूल्य असलेली आहे. विदर्भाच्या सर्व जिल्ह्यांना ऐतिहासिक वास्तूंचा वारसा लाभला आहे...
गाडगेबाबा – जिणे गंगौघाचे पाणी ! (Saint Gadgebaba’s Life of Service and Sacrifice)
गाडगेबाबा जिथं जिथं न्यून जाणवलं, तिथं तिथं ते भरून काढण्यासाठी नेटानं प्रयत्न करत राहिले. अनेकांची आयुष्यं त्यांच्या सहवासाच्या लेपानं सुगंधित झाली. गाडगेबाबा सभोवती माणसांचा समुद्र पसरलेला असतानाही आतून नि:संग राहिले...
मेळघाटातील खोज आणि बंड्या साने!
मनगटात जाड पितळी कडं. खादीच्या सदर्याच्या सरसावलेल्या बाह्या. डोक्याला बांधलेला गमछा. राठ काळी-पांढरी दाढी. आणि हिंदी-मराठी मिश्र बोली. मेळघाट नामक दुर्गम आदिवासी भागात प्रश्न सोडवण्यासाठी उलाढाल्या करणारं व्यक्तिमत्त्व. नाव-बंड्या साने. काम-कार्यकर्ता. तो गेली पंधरा-वीस वर्षे मेळघाटमध्ये तळ ठोकून आहे. ‘खोज’ ही त्याची संस्था...