सावित्रीबाई फुले यांनी स्त्रियांत शिक्षणाचे फार मोठे काम केले, पण त्यांच्याच काळात अनेक अनाम एकाकी स्त्रियांनी देशाच्या कानाकोपऱ्यात राहून तसेच काम केले आहे ! त्यापैकीच एक माझी पणजी सरस्वती नाईक. म्हणून मी म्हणते, "मी सरस्वती नाईकांच्या लेकीच्या लेकीची लेक आहे"...