साखरवाडी हे सातारा जिल्ह्याच्या फलटण तालुक्यातील गाव. महाराष्ट्रातील पहिला आपटे यांच्या मालकीचा खासगी साखर कारखाना म्हणून साखरवाडीच्या कारखान्याची नोंद आहे. गावाची क्रीडाक्षेत्रामधील कामगिरी उल्लेखनीय आहे. हे गाव खो-खो या खेळाची पंढरी म्हणून ओळखले जाते. या गावातील खो खो संघाचा दबदबा व दहशत कित्येक वर्षे महाराष्ट्रात होती. देशपातळीवरील सामन्यांमध्ये महाराष्ट्राच्या संघात साखरवाडीच्या संघातील कमीत कमी दोन खेळाडू असतातच !