कोल्हापूरच्या सुषमा बटकडली आणि रघुनाथ पाटील या दोघांनी, ती दोघे स्वत: एड्ससह आयुष्य जगत असताना एकत्र येऊन ‘जाणीव’ या संस्थेची स्थापना केली. ती दोघे एच.आय.व्ही. बाधित रुग्णांना औषधोपचाराविषयी मार्गदर्शन आणि महाविद्यालयांमधून एड्सविषयी जनजागृती असे काम करत आहेत. त्याखेरीज त्यांनी एड्स रुग्णांसाठी तात्पुरते आसरा स्थळ चालवले आहे...