Tag: Diwali
मराठवाडा : सण बाई दिवाळीचा राजा
मराठवाड्यातील दिवाळी खास आहे ती काही परंपरांमुळे. रेड्यांच्या टकरी, शेणापासून बनवलेले गोकुळ, म्हशींची मिरवणूक, गाई-म्हशींना ओवाळणे हे सारे कृषिसंस्कृतीतून, लोकसंस्कृतीतून झिरपलेले टिकून आहे...
गिरगावची दिवाळी – फराळ, अंघोळ, आकाशकंदिल…
पाठारे प्रभू ज्ञातीचे वास्तव्य दक्षिण मुंबईत प्राधान्याने होते. ते स्वतःला अस्सल मुंबईकर मानतात. त्या ज्ञातीमध्ये वर्षभर सर्व सण धूमधडाक्यात साजरे करण्याची परंपरा आहे. दिवाळीत पाठारे प्रभू पद्धतीचे सुकडी, तवसे, शिंगडी, भानवले, पंगोजी, मुम्बरे, बुंदीचे कडक लाडू असे पदार्थ केले जात. त्यांच्या पारंपरिक पदार्थांबरोबरच तेथील विशिष्ट प्रकारच्या रांगोळ्या प्रसिद्ध होत्या. असे म्हणतात, की त्या रांगोळ्या बघण्यास त्या काळी ब्रिटिश अधिकारी घोडागाडीतून येत...
सामुदायिक आनंदाची नाशिकची दिवाळी
नाशिक हे मंदिरांचे गाव. तेथे असंख्य आळ्या, पेठा नि वाडे. तेथे ‘दिवाळी तोंडावर आली’ हा शब्दप्रयोग ऐकू येई तो भाजणीच्या खरपूस वासानं ! पूर्वी देवदिवाळी ही नाशिकची खरी खासीयत. श्रद्धा असणारे भाविक नाशिक या मंदिराच्या गावात दिवाळीत आले की हात जोडतात नि अप्रूपाने त्रिपुरी पौर्णिमेला एक पणती प्रवाहात सोडतातच...
देव दीपावली (देवदिवाळी)
‘मासांना मार्गशीर्षो ऽ हम्’ या वचनाने गीतेत मार्गशीर्ष महिन्याचा गौरव केलेला आहे. त्या महिन्याच्या पौर्णिमेस किंवा मागेपुढे मृगशीर्ष नक्षत्र असते. केशव ही त्या महिन्याची...
बलिप्रतिपदा – दिवाळी पाडवा
कार्तिक शुद्ध प्रतिपदा हा दिवस बलिप्रतिपदा म्हणून पुराणातील बळीराजाच्या स्मरणार्थ साजरा होतो. तो दिवाळी पाडवा म्हणून ओळखला जातो. दिवाळीतील पाडवा हा साडेतीन मुहुर्तांपैकी एक...
लक्ष्मीपूजन (Laxmipujan)
आश्विन अमावास्या हा लक्ष्मीपूजनाचा दिवस मानला जातो. तो दिवाळी सणातील एक दिवस. त्या दिवशी प्रात:काळी मंगलस्नान करून देवपूजा करावी, दुपारी पार्वणश्राद्ध व ब्राह्मणभोजन घालावे...
धनत्रयोदशी
आश्विन वद्य त्रयोदशी म्हणजेच धनत्रयोदशी. त्या दिवशी यमराजाला प्रसन्न करण्यासाठी दीपदान करतात. या दिवसाला यमदीपदान असेही म्हणतात. या दिवशी उंच जागी तेलाचे दिवे लावतात....
वसुबारस (Vasubaras)
वसुबारस (गोवत्सद्वादशी) हा दिवस दिवाळीला जोडून येतो, म्हणून त्याचा समावेश दिवाळीत केला जातो; पण वस्तुत: तो सण वेगळा आहे. वसुबारस या शब्दातील वसू म्हणजे...