‘सोलापूर मार्शल लॉ’चे प्रकरण, त्याचा निकाल लागून गेल्यानंतरही चिघळत राहिले आणि त्याचे पर्यवसान ‘मार्शल लॉ’चे कर्ते अर्नेस्ट हॉटसन यांच्यावर गोळ्या झाडण्यात झाले. तो इतिहास रोमहर्षक आहे...
भारतीय स्वातंत्र्यलढ्यात सोलापुरला ‘मार्शल लॉ’चे महाभारत घडून आले. त्याआधी तेथे चक्क चार दिवस स्वराज्य होते. त्याला सोलापूरकर ‘गांधीराज’ म्हणत होते. अर्थात ते अचानक, एकाएकी घडले नाही.
ब्रिटिशांच्या जोखडाखालील भारत देश १५ ऑगस्ट १९४७ रोजी स्वतंत्र झाला. तरी सोलापूरच्या जनतेने त्याच्या सतरा वर्षे आधी, चार दिवस पूर्ण स्वातंत्र्य उपभोगले होते! त्या...