‘काकडे’ घराण्याची झुंजार परंपरा सतत चारशे वर्षे जपली गेली आहे. घराण्याचा आधुनिक काळातील इतिहास सुरू होतो एकोणिसाव्या शतकाच्या अखेरीस कान्होजी महादजी काकडे यांच्यापासून. कान्होजी आणि लक्ष्मीबाई यांना पाचव्यांदा मुलगा झाला तो जगन्नाथ म्हणजेच आबासाहेब. आबासाहेबांच्या विचारांची आणि सामाजिक व राजकीय कार्याची जडणघडण कोल्हापूर संस्थानामधील घटनाक्रमांतून होत गेली. आबासाहेब कोल्हापूरवरून नगर जिल्ह्यात- स्वमुलखात नुसतेच मल्लविद्या घेऊन परतले नाहीत तर मानवतावादी विचार घेऊन आले...