Tag: साहित्य संमेलनाची निवडणूक
विचार महत्त्वाचा की नाव आणि हेवेदावे?
उस्मानाबाद येथील नियोजित मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांच्या निवडीला विश्व हिंदू परिषदेने विरोध दर्शवला आहे. मला ‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’च्या कामानिमित्ताने वसईच्या फादर कोरिया यांना भेटण्याचा योग आला. कोरिया हे दिब्रिटो यांचे समकालीन, सहकारी. ते जीवनदर्शन केंद्राच्या (वसई) मासिकाचे संपादक आहेत. ते स्वतः लेखक-संशोधक आहेत. त्यांच्या भेटीमुळे मला त्या वादासंबंधातील एक चर्चाही ऐकण्यास मिळाली. त्यामुळे माझा योगायोगाने त्या वादाशी संबंध आला आणि मला त्यावर हसावे की रडावे हे कळेना...
साहित्य संमेलनांचा इतिहास (History Of Literary Conferances)
मराठी ग्रंथकारांचे पहिले संमेलन 11 मे 1878 या दिवशी पुण्यात भरले होते. आधुनिक महाराष्ट्रातील अनेक उपक्रमांचे प्रणेते न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे हे होते. पहिल्या ग्रंथकार संमेलनाची प्रेरणा ही न्यायमूर्ती रानडे आणि रावबहादूर गोपाळराव हरी देशमुख यांची होती. ते दोघे पहिल्या संमेलनाचे आणि पर्यायाने भविष्यकाळातील साहित्य संमेलनांचे शिल्पकार होते...
साहित्य संमेलनाध्यक्ष नवी निवडपद्धत : सफल – संपूर्ण?
साहित्य संमेलनाच्या अध्यक्षांची निवडणूक ही छटाकभर मतदारांची लोकशाही प्रक्रिया होऊन गेली आहे. ती मुठभरांची लोकशाही 2017 सालापर्यंत होती- म्हणजे वेगवेगळ्या प्रादेशिक साहित्यसंस्थांनी निवडलेल्या सुमारे...
अरुणा ढेरे – अभिजात परंपरेतील शेवटच्या संमेलनाध्यक्ष?
‘थिंक महाराष्ट्र डॉट कॉम’चे लेखक, नाशिकचे मराठीचे प्राध्यापक शंकर बोऱ्हाडे यांनी अरुणा ढेरे यांची साहित्य संमेलनाध्यक्ष म्हणून निवड झाल्यानंतर ‘फेसबुक’वर खट्याळ टिकाटिप्पणी केली आहे....
साहित्य संमेलनांचे अध्यक्ष – नाण्याची दुसरी बाजू
नामवंत लेखकांना अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदापासून दूर का ठेवले जाते? यावर दोन प्रकारच्या प्रतिक्रिया दिसून येतात. पहिला वर्गाचे मत साहित्य संस्थांच्या राजकारणातून...
नामवंत लेखकांना अध्यक्षपदापासून दूर का ठेवले जाते?
लक्ष्मीकांत देशमुख यांची बडोदा येथे होणा-या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी निवड झाली आहे. काहींना ती निवड अनपेक्षित वाटली तर काहींना तेच होणार...