सायकल हा नवा ट्रेंड समाजामध्ये तंदुरुस्तीसाठी म्हणून रुजत, वाढत आहे. सायकलस्वारी (सायकलिंग) हा खेळ, छंद, हौस म्हणून सर्वत्र मोठ्या प्रमाणात विकसित होत आहे. सायकल हे वाहन अनेक वाहनांच्या गलबल्यात स्थानिक प्रवास, छोट्या जा-ये करण्यासाठीदेखील उपयुक्त ठरत असल्याची जाणीव पुन्हा जनमनावर ठसत आहे...