Home Tags साखरवाडी

Tag: साखरवाडी

दीपक आपटे: सचोटीचा सागरी पर्यावरण वादी (Deepak Apte’s contribution to Marine Biology)

दीपक आपटे यांचे नाव महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात फारसे परिचित नाही; परंतु ते सागरी जीवशास्त्राच्या क्षेत्रात सन्मानाने घेतले जाते. त्यांची व्यावसायिक वाटचालही वेगळीच आणि प्रेरणादायी आहे. त्यांचे क्षेत्र निसर्गाचा अभ्यास, पर्यावरणविषयक शिक्षण आणि पर्यावरण संवर्धन हे होय. ते ‘बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी’ (बीएनएचएस) या आंतरराष्ट्रीय स्तरावर मान्यताप्राप्त मुंबईच्या संस्थेचे संचालक होते. त्यांनी ती संस्था 2021 मध्ये सोडली आणि पर्यावरणीय उपाययोजनेसाठी ‘सृष्टी कंझरव्हेशन फाउंडेशन’ची स्थापना केली. त्याचबरोबर, ते सध्या पुण्याच्या डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या अॅडव्हान्स रिसर्च सेंटरचे संचालक आहेत...

साखरवाडी – खो खो ची पंढरी

जसा लौकिक कुस्तीसाठी हरियाणाने, टेनिससाठी आंध्र प्रदेशने आणि फुटबॉलसाठी ईशान्य भारताने कमावला आहे, तसाच लौकिक महाराष्ट्राच्या सातारा जिल्ह्याच्या फलटण तालुक्यातील साखरवाडी नावाच्या गावाने खो-खो च्या राष्ट्रीय मैदानावर मिळवला आहे ! साखरवाडीच्या विशेषतः मुलींचा धसका देशभरच्या खो-खो खेळाडूंनी घेतला आहे. साखरवाडीच्या मुलींच्या मैदानावरील चपळाईने प्रतिस्पर्ध्यांना धडकी भरते आणि पाहणारे थक्क होऊन जातात ! त्या गावातून शंभराहून जास्त राष्ट्रीय खो खो खेळाडू घडले आहेत...

पिंपळवाडीची झाली साखरवाडी – सारे गोड गोड ! (Sakharwadi – Village transformed by private...

साखरवाडी हे सातारा जिल्ह्याच्या फलटण तालुक्यातील गाव. महाराष्ट्रातील पहिला आपटे यांच्या मालकीचा खासगी साखर कारखाना म्हणून साखरवाडीच्या कारखान्याची नोंद आहे. गावाची क्रीडाक्षेत्रामधील कामगिरी उल्लेखनीय आहे. हे गाव खो-खो या खेळाची पंढरी म्हणून ओळखले जाते. या गावातील खो खो संघाचा दबदबा व दहशत कित्येक वर्षे महाराष्ट्रात होती. देशपातळीवरील सामन्यांमध्ये महाराष्ट्राच्या संघात साखरवाडीच्या संघातील कमीत कमी दोन खेळाडू असतातच !