जळगाव येथे भरलेल्या बाविसाव्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष कवी माधव त्र्यंबक पटवर्धन ऊर्फ माधव ज्यूलियन होते. माधव ज्यूलियन आधुनिक उत्तम कवी, छंदोशास्त्राचे अभ्यासक, फार्शीभाषेचे उत्तम जाणकार, भाषाशुद्धीला स्वत:चे आयुष्य अर्पण करणारे, फार्शी-मराठी कोशाचे जनक होते.