बाबासाहेब आंबेडकर यांच्या संग्रहातील दुर्मीळ कागदपत्रे रासायनिक प्रक्रियेने सुरक्षित करून जतन करण्याची योजना सिद्धार्थ महाविद्यालयाने हाती घेतली आहे. त्यामध्ये बाबासाहेबांच्या टिपाटिप्पणी, नोंदी, प्रदीर्घ लेखन अशा विविध गोष्टींचा समावेश आहे; बाबासाहेबांच्या हस्ताक्षरातील या टिपणी कशा कशाच्या असाव्यात ! ‘रिपब्लिक’ शब्दाच्या अर्थच्छेदापासून व्हायोलिन वाद्याची स्वरलिपी... एवढेच काय, पत्नीच्या बाळंतपणानिमित्ताने केलेल्या ‘मॅटर्निटी नोट्स’ असे विविध तऱ्हेचे साहित्य त्यात आहे. सिद्धार्थ कॉलेजला हे शक्य झाले ते श्रीपाद हळबे या अर्थ व विधी क्षेत्रातील व्यावसायिकाने दिलेल्या देणगीमुळे...