गिरवी येथे असलेल्या गोपालकृष्ण मंदिरातील कृष्णाची मूर्ती सुंदर तर आहेच; परंतु तिच्या पाठीमागे, म्हणजे ती मूर्ती तयार व स्थापन होण्यामागे एक कथा आहे, तीही रोचक आहे. मूर्ती धेनुसहित श्रीकृष्णाची आहे. मंदिराभोवती दगडी चुनेगच्ची तट आहे. त्या सभोवतालच्या ओवऱ्यांवर मात्र आदिलशाही वास्तुरचनेची छाप आहे. गिरवी हे गाव फलटणपासून दक्षिणेला बारा किलोमीटरवर आहे...