Home Tags शिक्षण

Tag: शिक्षण

राजाराम महाराजांचे इटालीमध्ये स्मारक ! (Rajaram Maharaj Memorial In Italy)

0
कोल्हापूरचे महाराज राजाराम (दुसरे) ह्यांनी वयाच्या अवघ्या विसाव्या वर्षी, 1870 मध्ये युरोपात जाण्याचा निर्णय घेतला, तेव्हा जनसामान्यांत आणि काही कुटुंबीयांतही नाराजी उमटली. समुद्र ओलांडण्याला सनातनी हिंदुधर्मात मान्यता नाही असा समज होता ना ! पण राजाराम महाराज ती सर्व नाराजी ओलांडून निर्धाराने युरोपात गेले, कारण त्यांना युरोपीय शिक्षणपद्धत समजाऊन घेऊन ती स्वतःच्या संस्थानात सुरू करायची होती. राजाराम महाराज स्वतः इंग्रजी शिकलेले होते. त्यांनी उत्तम संभाषण इंग्रजीत करण्याइतकी पात्रता मिळवली होती. ब्रिटिशांनी राजाराम महाराजांना राज्यकारभार व शालेय शिक्षण, दोन्ही चांगल्या प्रकारचे देण्याची व्यवस्था केली होती...

पहिली सिग्नल शाळा ठाण्यात ! (Innovative Signal School in Thane)

ठाणे शहरातील तीन हात नाक्यासह विविध सिग्नलवर भटक्या-विमुक्त जमातींतील शंभराहून अधिक मुले पुलाखाली आश्रय घेऊन राहत होती. पैकी तीन हात नाक्यावरील मुलांचे तेथील वास्तव्य संपुष्टात आले. मुलांचे वडील तेथेच वाढले. मुलांचे जन्म आणि बालपण पुलाखालीच गेले. खरे तर, असे दृश्य एकट्या ठाणे शहरात नसून अशी शेकडो मुले भारतातील प्रत्येक महानगरामध्ये जगत असतात. सरकार शिक्षणप्रसारासाठी अनेक मोहिमा करत असते. तथापी शैक्षणिक, सांस्कृतिक, सामाजिक व आर्थिक दृष्ट्या मागास राहिलेली ही मुले मुख्य धारेच्या शाळांमध्ये प्रवेश घेण्यास अपात्र ठरतात. अशा वेळी, ठाण्याच्या काही कार्यकर्त्यांच्या प्रयत्नांतून ‘समर्थ भारत व्यासपीठ’ या सामाजिक संस्थेची ‘सिग्नल शाळा’ सुरू झाली...

बालशिक्षणातील अनुताईंचे प्रयोग ! (Anutai Wagh : Pioneering Efforts in Child Education)

अनुताई वाघ या ताराबाई मोडक यांच्या सहकारी. त्यांनी कोसबाडच्या आदिवासी भागातील बालशिक्षणाचे- ताराबाई मोडक यांचे कार्य जोमाने पुढे नेले. त्या कार्याला अनेक पदर जोडले. अनुताई यांचे वैयक्तिक आयुष्य दु:खद होते. त्यांना मातृत्व तर सोडाच; पण विवाहितेचे सौभाग्यही क्षणिक लाभले ! मात्र अनुताईंनी आदिवासींच्या व दलितांच्या मुलांना वात्सल्याने स्वत:च्या कवेत घेतले. त्या समाजातील मुलांचे खरे शिक्षण ‘त्यांना माणसात आणण्याचे’ होते. ती मुले केवळ शिक्षणापासून वंचित नव्हती, तर त्यांचे शिक्षणाशी जणू शत्रुत्व तयार झाले होते. त्यांनी तशा मुलांच्या गळी शिक्षण उतरवण्याचा लोकविलक्षण खटाटोप केला...

टीच – माणसे घडवणाऱ्या व्यवस्थेचा दिशादर्शक (TEACH Tool for School Inspection)

वर्गात शिकवण्याच्या पद्धतींच्या परिणामकारकतेवर लक्ष ठेवण्यासाठी जगभरातच कोणतीही प्रमाणित साधने वापरली जात नाहीत. असे साधन विकसित करण्याची गरज जागतिक स्तरावरील अभ्यासकांना तीव्रतेने जाणवली. त्यामधून जागतिक बँकेच्या शिक्षण गटाने TEACH हे प्रमाणित वर्गनिरीक्षण साधन विकसित केले आहे. या साधनामुळे शिक्षकांच्या अध्यापनाची गुणवत्ता, अभ्यासक्रम, पाठ्यपुस्तके यांची परिणामकारकता तपासण्यासाठी एक समान आणि विश्वसनीय अशी मोजपट्टी उपलब्ध झाली आहे...

उच्च शिक्षण, संशोधन – काही प्रश्न काही उत्तरे…

देशाला स्वातंत्र्य मिळून पंच्याहत्तर वर्षे झाली. मात्र शिक्षणाचे मूळ उद्दिष्ट समजून घेतले जात नाही. शिक्षण हे पदवी-सर्टिफिकेट घेण्यासाठी अन् पर्यायाने नोकरीसाठी गरजेचे म्हणून घेतले जाते. ज्ञान मिळवण्यासाठी शिक्षण हे मूळ उद्दिष्ट बाजूला राहते. त्यामुळे शिकवणारे, शिकणारे या सर्वांची दिशाभूल होते. सगळे लक्ष मार्क्स, श्रेणी, पर्सेंटेज यांकडे लागलेले. परीक्षांचे नियोजनदेखील त्या उद्दिष्टाने केले जाते. कोणतीही परीक्षा विद्यार्थी काय, कसे शिकला हे तपासत नाही...

शिक्षण कशासाठी- हे समजेल का?

शिकवण्याची नव्हे तर शिकण्यासंबंधीची आव्हाने या शतकात वाढत जाणार आहेत. भारतीय शिक्षणव्यवस्था ‘टीचिंग’चा विचार करते; सगळा भर अभ्यासक्रम पूर्ण करण्यावर असतो. विद्यार्थी काय व किती शिकला याचा विचार फारसा नसतो. त्याच्या शिक्षणाचे मूल्यमापन ज्या परीक्षांद्वारे होते त्याही कुचकामाच्या आहेत. शास्त्र, विज्ञान समजून घेणे खूप कठीण नाही, पण ते तसे सोपेदेखील नाही ! शिकणे याचा अर्थ पुस्तकातून माहिती गोळा करणे, दिलेला अभ्यासक्रम पूर्ण करणे हा नव्हे ...

न्या केशवराव कोरटकर – हैदराबाद लढ्यातील मवाळ कार्यकर्ते (Justice Keshavrao Koratkar – An Activist...

1
न्यायमूर्ती केशवराव कोरटकर (1867-1932) हे हैदराबाद स्वातंत्र्यलढ्यातील मवाळ कार्यकर्ते म्हणून प्रसिद्ध आहेत. परंतु त्यांनी बजावलेली कामगिरी शतकभराहून अधिक काळ हैदराबाद शहरी दृगोचर होत आली आहे. त्यांपैकी दोन संस्था म्हणजे विवेकवर्धिनी शिक्षणसमूह आणि महाराष्ट्र साहित्य परिषद. केशवरावांचा जन्म गरीब ब्राह्मण कुटुंबात झाला. ते निजाम राज्यात मुख्य न्यायाधीशपदापर्यंत स्वकर्तृत्वावर पोचले होते...

आधुनिक फलटणचे शिल्पकार – मुधोजीराजे

मुधोजीराजे यांच्याकडे फलटण संस्थानाची गादी 10 फेब्रुवारी 1860 रोजी आली. मुधोजीराजे हे कार्यक्षम आणि तळमळीचे राजे होते. त्यांनी फलटणला एक आदर्श संस्थान 1860 ते 1916 या कालावधीत बनवले. मुधोजीराजे हे विसाव्या शतकातील पहिले राजे. महाराष्ट्रात आधुनिकीकरणाच्या प्रक्रियेला त्या काळात आरंभ झाला होता. इंग्रजी शिक्षण घेतलेले नवशिक्षित, सुधारकी विचारांचे तरुण समाजात सुधारणा घडवून आणण्याच्या खटपटीत होते. मुधोजीराजांनी बदलत्या काळाची पावले ओळखून संस्थानात बदल सुरू केले. त्यांच्या काळात फलटणच्या आधुनिकीकरणाचा पाया घातला गेला...

पद्मा पिंपळीकर – अचलपुरावरील अमीट ठसा

पद्मा अनंत पिंपळीकर अचलपूरात राहत नाहीत. त्यांनी ते गाव सोडले व त्या लेकाकडे- श्रीरामकडे राहण्यास गेल्या. परंतु त्यांची छाप- त्यांच्या आठवणी अचलपूरच्या विशेषत: पांढरपेशा स्त्रीजीवनावर आहेत. मुख्यत: सुबोध हायस्कूलच्या शिक्षिका म्हणून त्यांच्या विविध आठवणी अचलपूरला आहेत. त्यांनी किती वेगवेगळ्या स्वरूपाची कामे गावात करून ठेवली आहेत !

रतनबाई – तरुण विवाहितेचे शब्दचित्र

हिंदुस्थानी महिलेने लिहिलेले आणि इंग्लंडमध्ये प्रकाशित झालेले पहिले पुस्तक मराठी लेखिकेचे होते. ते लंडनमध्ये 1895 साली प्रसिद्ध झाले. त्या पुस्तकाचे नाव Ratanbai - A Sketch of a Bombay High Caste Young Wife. त्या पुस्तकाच्या लेखक शेवंतीबाई निकंबे या होत्या. पुस्तकाच्या सतरा आवृत्त्या 1895 ते 2017 या काळात निघाल्या...