नागरिकत्व दुरुस्ती विधेयक आणि कायदा ह्यामुळे देशातील वातावरण तापले होते. कोरोनामुळे तो मुद्दा थोडा बाजूला पडला आहे. मुस्लिम बांधवांचा सूर नागरिकत्व कायद्याबद्दल नकारात्मक जाणवतो. त्यांच्यात असुरक्षिततेची भावना रुजली आहे का? तशातच काही मुस्लिम तसेच हिंदुत्ववादी
रघुवीर सामंतांच्या संकेतस्थळाचे उद्घाटन जुन्याजाणत्या मराठी लेखक-समीक्षकांच्या वेबसाइट्स बनवण्याच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पास चालना 'थिंक महाराष्ट्र' या वेबपोर्टलतर्फे देण्यात येत आहे. महाराष्ट्र भाषा-संस्कृती यांचे जतन व संवर्धन आणि त्याकरता
मंगळवेढा हे गाव संतभूमी म्हणून महाराष्ट्राला परिचित आहे. ते आहे सोलापूर जिल्ह्यात; पंढरीच्या विठुरायापासून अवघ्या बावीस किलोमीटर अंतरावर, दक्षिणेला. महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांचा समन्वय तेथे साधला जातो. मंगळवेढा तालुक्याची लोकसंख्या दीड लाखाच्या आसपास आहे.
झाडीपट्टी रंगभूमीला एकशेबत्तीस वर्षें पूर्ण झाली आहेत. पूर्व विदर्भातील चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, भंडारा या चार जिल्ह्यांची ‘झाडीपट्टी’ म्हणून ओळख आहे. त्या प्रदेशांत हिरव्याकंच झाडीने, जंगलांनी व्याप्त निसर्गाची लयलूट आहे.
शेषराव घाटगे यांच्या आयुष्याची चित्तरकथा मोठी रोमांचकारक आहे. त्यांनी स्वातंत्र्यलढ्यात हौतात्म्य पत्करूनही त्यांच्या वाट्याला उपेक्षा आली. त्यांच्या चरित्रसाधनांवर 2011 ते 2012 या शताब्दी वर्षात प्रकाश पडला! त्यांचा चरित्रग्रंथ एकशेदोन वर्षांनी (मरणोत्तर एकोणसत्तर वर्षांनी) प्रसिद्ध झाला...
ग्रामदेवतांचे शेंदूर फासलेले ओबडधोबड आकारातील तांदळे गावोगावच्या वेशींवर पाहण्यास मिळतात. त्यांची नावे म्हसोबा, विरोबा, वेताळदेव, बापदेव, गावदेवी यांसारखी असतात. ‘शितलादेवी’ अथवा ‘शीतळादेवी’ ही त्या देवतांपैकी वैशिष्टयपूर्ण देवता...
विष्णूचे मूर्तिरूपात पूजन आणि त्यासाठी मंदिरनिर्माण परंपरा भारतीय भूमीवर गेल्या बावीसशे वर्षांपूर्वीपासून दिसून येते. ब्रह्मा, विष्णू आणि महेश या लोकप्रिय त्रिमूर्तीपैकी विष्णू हा एक. विष्णूचे उल्लेख वैदिक वाङ्मयापासून मिळतात.
शहाबाजहे रायगड जिल्ह्यातील तीनचार हजार लोकवस्तीचे छोटे गाव, पण ते शिक्षणक्षेत्रातील प्रसिद्धीने खूप मोठे झाले. त्या खेड्याने रायगड जिल्ह्याला शिक्षकांचा पुरवठा सतत केला. शहाबाज गावाने त्याचे वेगळे स्थान आगरी समाजाच्या चळवळीचे व सुधारणांचे उगमस्थान म्हणूनही निर्माण केले आहे.
विष्णू आणि त्याचे राम व कृष्ण हे दोन मुख्य अवतार यांची आराधना करणारा तो वैष्णव संप्रदाय. नारायण-विष्णूमधील नारायण या देवाचा उल्लेख प्रथम ‘शतपथ ब्राह्यण’ ग्रंथात आढळतो. तो वैदिक देव नव्हे. विष्णू या देवाचा उल्लेख ऋग्वेदात फक्त पाच सूक्तांत आहे.
'चले जाव'ची घोषणा 8 ऑगस्ट 1942 रोजी मुंबई येथील गवालिया टँक मैदानावर काँग्रेसच्या वतीने केली गेली. 'ब्रिटिशांनी तत्काळ हा देश भारतीयांच्या हाती सोपवून चालते व्हावे' असा निर्वाणीचा इशारा त्या वेळी देण्यात आला.