Tag: वैभव
फुलपाखरांच्या गावात…
श्रीकृष्णांचे गुरू सांदिपनी यांचा आश्रम पालघर जिल्ह्यातील चांदिप गावात होता असे म्हटले जाते. सांदिपनी ऋषींचे गुरुकुल मध्यप्रदेशात आहे. महाराष्ट्रातील चांदिप हे ठिकाण मात्र ‘नाही...
मराठी आणि बंगाली रंगभूमी : आरंभीचा इतिहास
भारतीय रंगभूमीचे अभ्यासक गिरीशचंद्र घोष यांना बंगाली रंगभूमीचे जनक म्हणतात. चेतनानंद यांच्यासारख्या रामकृष्ण मिशनमधील मोठ्या व्यक्तीने गिरीशचंद्र यांचे चरित्र लिहिले, ते कुतूहलाने वाचले आणि बंगाली रंगभूमीचा इतिहास डोळ्यांसमोर उलगडत गेला. बंगाली रंगभूमी आणि मराठी रंगभूमी यांच्या सामाजिक पार्श्वभूमीत काही साधर्म्य आढळली. स्त्रियांनी नाटकात काम करण्याला दोन्ही रंगभूमीवर तितकाच विरोध आणि उपहासात्मक टीका झाली...
स्वप्नसोपान बारोंडागड
‘बारोंडागड’ हे नाव खडबडीत आहे. ते ठिकाण पालघर जिल्ह्यातील विरारपासून हाकेच्या अंतरावर असूनही लोकांच्या नजरांपासून मात्र दूर राहिले आहे. ते झाकले माणिक आहे असेही म्हणता येईल. सूर्योदय, सूर्यास्त, पावसाळा, हिवाळा या सगळ्याची उत्कंठा अनुभवावी ती निसर्गरम्य बारोंडागडावर !
कोल्हापूर-मिरज रेल्वेचा आरंभ !
छत्रपती शाहू महाराज यांच्या शंभराव्या पुण्यतिथी निमित्ताने कोल्हापुरात कृतज्ञता पर्व सुरू आहे. त्यानिमित्त अनेकानेक कार्यक्रम होत आहेत. शाहू महाराजांनी कोल्हापूर ते मिरज या रेल्वेमार्गाची पायाभरणी करून तो प्रकल्प तीन वर्षांत पूर्ण केला. त्यावरून कोल्हापुरी जिद्द व चिकाटी दिसून आली. एक राजा लोहमार्ग बांधतो, याचेच सगळ्यांना अप्रूप होते !
खेळ मांडीयेला : भातुकलीचा इतिहास (Bhatukli – Enjoyable home management game for girls)
वृत्तनिवेदिका दीपाली केळकर यांच्या ‘खेळ मांडीयेला’ या पुस्तकातून भातुकली या खेळाचा, मराठी संस्कृतीचा व समृद्ध परंपरेचा इतिहास आणि वारसा प्रकट होतो ! भातुकलीच्या सर्व पैलूंचे दर्शन आणि दस्तावेजीकरण या पुस्तकात आढळते…
अण्णासाहेब किर्लोस्कर आणि संगीत शाकुंतल (Annasaheb Kirloskar And Sangeet Shakuntal)
अण्णासाहेब किर्लोस्कर यांनी मराठी संगीत नाटकाचे एक युग घडवले ! त्यांना नाटकांचा छंद जडला आणि त्यांचा विद्याभ्यास संपला. अण्णासाहेबांनी कालिदासांच्या संस्कृत शाकुंतल वरून मराठीत लिहिलेल्या ‘संगीत शाकुंतल’ने मराठी संगीत नाटकांची नांदी केली आणि इतिहास घडवला. त्यांनी आणि त्यांच्या किर्लोस्कर नाटक मंडळीने नाट्य व्यवसायाला प्रतिष्ठा प्राप्त करून दिली…
कोंडगाव-साखरपा हीच तर जुनी पेठ इभ्रामपूर! (Historical Reference of Kondgoan- Sakharpa)
साखरपा आणि कोंडगाव ह्या दोन्ही गावांचा उल्लेख साधारणत: एकत्रच केला जातो. ती दोन्ही गावे एकमेकांना लागून, जुळ्या भावांसारखी आहेत. ती गावे गड व काजळी या दोन नद्यांच्या संगमावरवसलेली आहेत.
न्हैचिआडच्या रेग्यांचा गणपती (Ganpati From Nhaichiaad)
सिंधुदुर्गजिल्ह्यात वेंगुर्ल्याहूनशिरोड्याला जाताना वाटेत मोचेमाडची खाडी लागते. ती खाडी ओलांडली की डाव्या कुशीला लागतं आमचं न्हैचिआड. न्है म्हणजे नदीअथवा खाडी. त्यांच्या आड वसलेलं, म्हणून...
मार्लेश्वर : प्रतिकैलास (Marleshwar From Ratnagiri District)
श्री क्षेत्र मार्लेश्वर प्रतिकैलास म्हणून ओळखले जाते. ते रत्नागिरीच्यासंगमेश्वर तालुक्यात आहे. ते मारळ गावाचे आराध्य दैवत. त्या तीर्थक्षेत्राला लागून बारमाही अखंड कोसळणारा धबधबा आहे. तो म्हणजे मार्लेश्वरचा धारेश्वर धबधबा.
लोककथांचीच कहाणी! (Story of Folktells)
लोककथा हे कोणत्याही समाजाचे धन असते. समाज जितका पुरातन तितक्या लोककथा अद्भुतरम्य. लोककथा लहान मुलांनाच नव्हे तर मोठ्या माणसांनासुद्धा आवडतात आणि ते नैसर्गिक आहे. कारण त्यांनी मनोरंजन तर होतेच व त्याबरोबर बोधही मिळतो.