Tag: वास्तुरचनाकार
पुण्यातील बाटल्यांचा बंगला
राजेंद्र इनामदार लोकांनी इकडे-तिकडे भिरकावून दिलेल्या पाण्याच्या बाटल्या पाहिल्या की अस्वस्थ होत. मग त्यांनी त्या पोत्यात भरून गोळा करण्यास सुरुवात केली. दगडाचे चूर्ण, पाणी आणि फक्त सहा-सात टक्के सिमेंट यांचे पातळ मिश्रण त्या बाटल्यांत भरून साकारलेला त्यांचा बाटल्यांचा बंगला. या ‘बाटल्यांच्या बंगल्या’साठी त्यांनी आजपर्यंत ऐंशी हजार बाटल्या गोळा केल्या आहेत. त्या बाटल्यांची शक्ती किती दाबाने तुटू शकते ती क्षमता (क्रशिंग स्ट्रेंग्थ) तपासून पाहिली असता ती नेहमीच्या विटांच्या अडीच ते तीन पट जास्त भरली. यामुळे त्यांचा प्रयोगाचा उत्साह त्या ‘स्ट्रेंग्थ’च्या दुपटीने वाढला !