पंढरपूरची वारी पुण्याजवळच्या देहू-आळंदीपासून सुरू होते. महाराष्ट्राच्या गावागावांतून दिंड्या निघालेल्या असतातच. लक्षावधी वारकरी वीस दिवस चालत असतात. वारीची सांगता एकादशीला पंढरपूर तीर्थक्षेत्री होते. डोळ्यांत भक्ती आणि मुखावर हरिनाम जपणारे हे वारकरी, समाजातील एकतेचे जिवंत चित्र उभे करतात. त्यामुळे वारी केवळ धार्मिक यात्रा राहत नाही; ती महाराष्ट्राच्या संस्कृतीचे प्रतीक होते. मात्र लक्षात घेतले पाहिजे, की हाच सोहळा कधी काळी समाजाच्या एका मोठ्या वर्गासाठी क्लेशदायक होता. अनेक दिवस चालून आलेल्यांपैकी काही वंचितांना गाभाऱ्यात जाऊन पांडुरंगाचे दर्शन न घेताच परत फिरावे लागे. त्या अन्यायाला वाचा फोडली ती साने गुरुजी यांनी...