भारतीय लोक विविध कारणांनी फार मोठ्या संख्येने पूर्व आशियात स्थलांतरित होत होते. त्या भागांत गेलेले असे अनेक लोक तेथील स्त्रियांशी लग्ने करून, वसाहत तेथे निर्माण करून राहत. भारतीयांजवळ प्रभावशाली सांस्कृतिक ऐवज होता. त्यामुळे भारतीयांचा बौद्धिक, सांस्कृतिक, धार्मिक आणि राजकीय वरचष्मा सहजगत्या निर्माण होई. कालांतराने पूर्व आशियात हिंदू राज्ये आणि संस्कृती उदयाला त्या वसाहतींमधून आली…