तब्बल शंभरी ओलांडलेल्या बत्तीस हजार नवीन नागरिकांची भर एका 2015 या वर्षामध्ये जपानमध्ये पडली ! त्यामुळे शंभर वर्षांपेक्षा जास्त वय असलेल्या हयात नागरिकांची संख्या त्या साली पासष्ट हजारांपेक्षा जास्त झाली आणि नंतर ती त्याच वेगाने वाढत आहे. अमेरिका दुसऱ्या क्रमांकावर आहे. अमेरिकेत अंदाजे दहा हजार नागरिक शतायुषी आहेत. जपानची लोकसंख्या अमेरिकेच्या फक्त एक तृतीयांश इतकी आहे. त्यामुळे प्रमाणाच्या दृष्टीने पाहण्याचे झाले तर जपान या बाबतीत कोठल्या कोठे पुढे आहे...