वंजारवाडी (जिल्हा बीड) ते लंडन व्हाया पुणे हा प्रवास आहे शरद उत्तमराव तांदळे या तरुण उद्योजकाचा आणि अर्थातच, हा प्रवास आहे एका यशोकथेचा. वंजारवाडी या छोट्याशा गावातून सुरुवात करून, पुण्यासारख्या ठिकाणी येऊन धडपडत, कष्ट करत, अडचणींना सामोरे जात उद्योजक बनलेल्या शरद तांदळे यांच्या यशावर मोहोर उमटली ती इंग्लंडचे युवराज प्रिन्स चार्ल्स यांच्याकडून. त्यांच्या हस्ते शरद यांना लंडनमध्ये तरुण उद्योजकतेचा पुरस्कार मिळाला...