रेमण्ड सॅविग्नॅक हे प्रसिद्ध फ्रेंच अभिजात उपयोजित चित्रकार होते. सॅविग्नॅक यांनी फ्रेंच ग्राफिक डिझाईन व जाहिरातकला या क्षेत्रात गेल्या शतकारंभी पन्नास वर्षेपर्यंत अतिशय उच्च दर्ज्याचे असे काम केले- नवे पायंडे पाडले. महाराष्ट्राच्या/भारताच्या दृष्टीने त्यांचे महत्त्व असे की त्यांना समांतर अशी कामगिरी शि.द. फडणीस यांनी त्यानंतर सुमारे वीस वर्षांनी महाराष्ट्रात केली. त्यामुळे सॅविग्नॅक यांचे काम जाणून घेणे महत्त्वाचे आहे. ते वयाच्या पंच्याण्णव्या वर्षी, 2002 मध्ये निधन पावले. त्यांच्या प्रती आदर व्यक्त करण्यासाठी त्यावेळी एक वेगळाच प्रयोग घडवून आणला गेला. त्यामुळे त्यांचे कार्य विशेषत: पाश्चात्य जगात पुन्हा उजळले गेले...