सोलापूरचे स्वातंत्र्यसैनिक डॉ. कृ.भी. अंत्रोळीकर हे राष्ट्रीय चळवळीकडे विद्यार्थिदशेतच ओढले गेले होते. अंत्रोळीकर यांना गांधीजींची धडपड नेमकी भावली होती. गांधीजींचे सारे प्रयत्न सामान्यातील सामान्य माणूस त्या चळवळीत समाविष्ट करावा यासाठी होती. त्यामुळे अंत्रोळीकर यांनी आयुष्यभर तो मार्ग अनुसरला. तोपर्यंत सोलापूरमधील चळवळ ही प्रामुख्याने उच्च शिक्षितांची होती...