Tag: रायगड जिल्हा
लेणी कोंडाण्याची (Cave Sculpture of Kondana)
कोंडाणे लेणी रायगड जिल्ह्यात कर्जत तालुक्यात त्याच नावाच्या गावात आहेत. बोरघाटातील राजमाची किल्ल्याच्या पायथ्याशी घनदाट अरण्य आहे. मोठे वृक्ष, महाकाय वेली आणि जंगली श्वापदे यांचा वावर तेथे असतो. त्यात वृक्षवेलींच्या-झाडझाडोऱ्यांच्या गुंत्यात लपल्या होत्या कोंडाणे लेण्यांच्या अप्रतिम शिल्पकृती. लेणी इसवी सनापूर्वी पहिल्या-दुसऱ्या शतकांत साकारण्यात आली. परंतु ती लेणी किर्र रान, मुसळधार पाऊस आणि भूकंप यांनी झालेली पडझड यांमुळे ओसाड होऊन गेली आणि विस्मृतीच्या पडद्याआड सारली गेली...
चौलची खाडीसफर आणि नौकांची शर्यत (‘Creek Jaunt’ at Chaul and Korlai)
कोर्लई, रेवदंडा, चौल आणि आग्राव या, रायगड जिल्ह्यातील अलिबागजवळच्या चार गावांतील कोळीबांधव गुढी पाडव्याच्या दुसऱ्या दिवशी नौकानयन स्पर्धा योजतात. त्यात परंपरा आहे आणि मौजमस्तीही आहे...