राजाळे गावात मंदिरे जरी अनेक असली तरी जानाई देवीचे स्थान अनन्य आहे. मंदिरामुळे गावाला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळालेला आहे. भाविक श्री क्षेत्र राजाळे नगरीत कर्नाटक, विजापूर, अहमदनगर, परभणी, बीड, चंद्रपूर या ठिकाणांहून येत असतात...
राजाळे गाव सातारा जिल्ह्यात फलटणपासून पूर्वेला बारा किलोमीटर अंतरावर आहे. ते गाव सधन व विकसनशील आहे..समाजप्रबोधन हेच ब्रीद मानून वैचारिक परंपरा असलेले गाव म्हणून राजाळे गाव पंचक्रोशीत प्रसिद्ध आहे...