Tag: राजकीय
वसंतदादा : हृदयस्पर्शी परंतु संदर्भात कच्चे ! (Vasantdada Patil Comemorative Volume – Sensitively Compiled...
‘वसंतदादा’ या स्मृतिग्रंथातील एकतीस लेख राजकारणी दादांमधील ‘माणूसपण’ दाखवणारे आहेत. त्यांच्यातील ‘जिंदादिल माणूस’ टिपणाऱ्या लेखांमधील अनेक प्रसंग वाचताना डोळे पाणावतात. महाराष्ट्रातील 2020 च्या दशकातील राजकारण आणि राजकारणी पाहता त्यांतील...
दादांच्या स्मृतिग्रंथात शालिनीताई अनुपस्थित !
वसंतदादा हे असामान्य, कर्तृत्ववान व्यक्तिमत्त्व होतेच, पण शालिनीताई यांचेही कार्यकर्तृत्व स्वतंत्रपणे विचारात घ्यावे लागेल. त्या महाराष्ट्रातील एक माजी मंत्री, माजी खासदार व सहकार क्षेत्रातील कार्यकर्त्या होत्या. त्यांनी राजकारणात स्वत:चे वेगळे स्थान निर्माण केले. त्यांच्याविषयीची माहिती पुस्तकात असणे आवश्यकच होते...
टिळक-गांधी आणि त्यांचा निर्भयतेचा वारसा
लोकमान्य टिळक आणि महात्मा गांधी यांनी त्यांच्या राजकीय आणि सामाजिक जीवनात काही मूल्ये रुजवण्याचा प्रयत्न केला आणि तो त्यांचा वारसा महत्त्वाचा आहे. लोकमान्यांनी स्वतंत्र देशात जगण्याचा लोकांना अधिकार आहे, हे लोकांच्या मनावर बिंबवून देशाचे स्वातंत्र्य हे महत्त्वाचे मूल्य प्रस्थापित केले. अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा त्यांचा आग्रह हा देशाच्या भावी घटनात्मक व्यवस्थेतील महत्त्वाचा भाग ठरला. गांधीजींनी राजकीय स्वातंत्र्याबरोबरच आर्थिक स्वातंत्र्य आणि त्यासाठी स्वावलंबन यांचा पुरस्कार केला. गांधीजींचा दुसरा मूल्यसंस्कार हा समतेचा आहे. गांधीजींचा आग्रह धर्म हा लोकांनी त्यांच्या राजकीय आणि सामाजिक व्यवहारातून बाजूला ठेवावा हा होता...