कोणत्याही कृतीपेक्षा त्यापाठीचा विचार, ती व्यक्ती नर आहे की नारायण (अथवा राक्षस) ते ठरवतो. गोष्टीतील श्रीमंत बाईसारखे अनेक लोक आजूबाजूला असतात. स्वतःसाठी लक्षावधी रुपयांची उधळण करणारे, पण दुसऱ्याला शंभर रुपये देतानाही हात मागे घेणारे. त्याचबरोबर, दुसऱ्याच्या वेदनेने दुःखी होणारे, स्वतः उपाशी राहून स्वत:चा घास भुकेल्या जीवांना देऊन तृप्त करणारे पुण्यात्मेही याच जगात दिसतात ! अशा ‘देवमाणसां’तील विठ्ठल-रखुमाईचा एक जोडा म्हणजे आनंद भिडे आणि अनुश्री भिडे...